Coronavirus : ‘लॉकडाऊन’मधून बाहेर पडला न्यूझीलंड, या आठवडयात उघडणार मॉल, जिम आणि थिएटर

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना महामारीमुळे अनेक जणांना प्राण गमवावे लागले असले तरीही बहुतांश देशांची यातून सुटका झालेली नाही. अशात अर्थव्यवस्थेला प्रचंड फटका बसत आहे. काही देशांमध्ये हळूहळू सर्व व्यवहार सुरू होत आहेत.

त्याचच एक भाग म्हणून न्यूझीलंडमध्ये येत्या गुरुवारपासून मॉल, जिम, थिएटर आणि कॅफे सुरू होणार आहेत. ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वांधिक लोकसंख्या असलेल्या व्हिक्टोरिया राज्यात मंगळवारी धार्मिक कार्यक्रम आणि सामुदायिक खेळांवर घातलेली बंदीमध्ये थोडी सूट देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

फ्रान्समध्येही आठ दिवसांनंतर गरजेच्या वस्तूंव्यतिरिक्त इतर वस्तूंची दुकानं, कारखाने आणि इतर व्यवसाय पुन्हा सुरू झाले. शाळाही टप्याटप्याने सुरू होणार आहेत.