‘हा’ व्यक्ती घालतोय देशातील सर्वाधिक महागडा मास्क ? किंमत 3 लाख रुपये

पुणे पोलीसनामा ऑनलाईन : कोरोना व्हायरस महामारी टाळण्यासाठी मास्क आवश्यक आहे. अश्या परिस्थितीत काही प्रमाणात मास्कचा तुटवडा जाणवत असताना महाराष्ट्रातील पुण्याला लागून असलेल्या पिंपरी चिंचवडमध्ये शंकर कुऱ्हाडे ही व्यक्ती सोन्याचा मास्क लावून फिरताना दिसत आहे. हा मास्क साडेपाच तोळ्यांचा असून त्याची किंमत सुमारे 3 लाख असल्याचे समजते. देशातील सर्वात महागडा मास्क म्हणून काही माध्यमांच्या वृत्तांतही त्याचे वर्णन केले जात आहे. दरम्यान, सोन्याचे शौकीन असलेले शंकर आपल्या शरीरावर सुमारे 3 किलो सोने घालतात. त्यांच्या गळ्यात सोन्याची एक जाड साखळी, हाताच्या दहा बोटाने सोन्याच्या अंगठ्या आणि मनगटात ब्रेसलेट हे त्यांचे सोन्यावरील प्रेम दर्शवते.

माहितीनुसार, हा मास्क 2 लाख 90 हजार रुपयांमध्ये बनविण्यात आला आहे. त्याचे वजन साधारण साडेपाच तोळे आहे. त्यात श्वास घेण्यास बारीक छिद्र असून कोरोनापासून बचावासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. शंकर यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, कोल्हापुरात चांदीचा मास्क घातलेला एक माणूस टीव्हीवर दिसला होता, तेव्हा मला सोन्याचा मास्क बनवण्याची कल्पनाही आली. त्यांनी पुढे सांगितले की, त्यांनी आपल्या सोनारांना हि बाब सांगितली आणि त्याने सुमारे एका आठवड्यात ते तयार केले गेले.

दरम्यान, दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमती प्रति 10 ग्रॅम 237 रुपयांची वाढून 49,022 च्या पातळीवर पोहोचल्या. यापूर्वी गुरुवारी ते प्रति 10 ग्रॅम 48,785 रुपये होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याची नवीन किंमत प्रति औंस 1,774 डॉलर होती, त्याचप्रमाणे चांदी 740 रुपये प्रति किलोने स्वस्त झाली, त्यानंतर नवीन किंमत, 49,060 वर आहे. यापूर्वी गुरुवारी ही किंमत प्रतिकिलो 49,800 रुपये होती. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांदीची नवीन किंमत 17.99 डॉलर प्रति औंस होती.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like