‘कोरोना’ स्थितीसंदर्भात आज सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनावरील लस कोणाला द्यायची यावरून झालेले घमासान थांबते न थांबते तोपर्यंत देशातील कोरोना स्थितीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक होणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने ही बैठक होणार असून, यात अनेक पक्षांच्या नेत्यांचा सहभाग असेल.

कोरोना लशीसंदर्भातील या सर्वपक्षीय बैठकीत अनेक विरोधी पक्षातील नेते भाग घेण्याची शक्यता आहे. यापूर्वी दिवाळीनंतर देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा वेगाने होणारी वाढ लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने बैठक घेतली होती. त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेत काही सूचना केल्या होत्या.

आज होणाऱ्या बैठकीत बीजू जनता दलचे चंद्रशेखर साहू, वायएसआरसिपचे विजयसाई रेड्डी आणि मिथून रेड्डी, आयएमआयएमचे इम्तियाज जलील, शिवसेनेचे विनायक राऊत, जेडीयूचे आरसीपी सिंह, काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी आणि गुलाम नबी आजाद, टीएमसीचे सुदीप बंद्योपाध्याय आणि डेरेक ओ’ ब्रायन, एआयए एमकेचे नवनीत कृष्णन, डीएमकेचे टीआरके बालू आणि तिरुची शिवा, जेडीएसचे एचडी देवेगौडा, एनसीपीचे शरद पवार, समाजवादी पक्षाचे राम गोपाल यादव, बसपचे सतीश मिश्रा, राष्ट्रीय जनता जलाचे प्रेम चंद्र गुप्ता, टीडीपीचे जय गल्ला, आपचे संजय सिंह, टीआरएसचे नाम नागेश्वर राव, लोक जनशक्ती पक्षाचे चिराग पासवान, अकाली दलाचे सुखबीर बादल यांचा समावेश असणार आहे.

दिल्लीत गुरुवारी कोरोनामुळे ८२ जणांचा मृत्यू
देशाची राजधानी दिल्ली बाधितांची संख्या वाढत आहे. गुरुवारी ३ हजार ७३४ नवे कोरोनाबाधित आढळले, तर ८२ जणांचा गेल्या 24 तासांत मृत्यू झाला आहे. आतापर्यंत दिल्लीत ९ हजार ४२४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिल्ली येथे गुरुवारी सक्रिय रुग्णांची संख्या ३० हजार ३०२ वरून २९ हजार १२० वर आली आहे. संपूर्ण देशातील कोरोनाबाधितांची संख्या ९५ लाखांच्याही पुढे गेली आहे, तर १.४० लाखांच्या जवळपास लोकांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.

You might also like