‘कोरोना’पासून बचाव करायचाय ? ‘या’ 3 गोष्टी करा जवळ, आयुष मंत्रालयाचा सल्ला

नवी दिल्ली : वृत्त संस्था – केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि आयुष मंत्रालयानं प्रयोग पद्धतीच्या आधारावर कोरोनाविरोधातील युद्धात आयुर्वेद आणि योग यांना फार महत्त्व आहे अशी घोषणा केली आहे. जर कोरोनाची लागण झाली तर योग्य व्यवस्था केली गेली आणि रुग्ण बरा झाला तर तो त्याची प्रतिकारशक्ती उत्तम करू शकतो.

आयुष मंत्रालयाचे सचिव वैद्य राजेश कोटेचा यांनी म्हटलं आहे की, आयुर्वेद आणि योग व्यवस्थेदरम्यान लोकांनी 6 फूट अंतर आणि मास्क घालण्याच्या नियमांचं पालन कठोरपणे करावं. हे पालन सध्या लोक करीतच आहेत. कारण आयुर्वेद आणि योगा कोरोनाविरोधातील युद्धात तुम्हाला बळकट बनवू शकतो.

कोटेचा म्हणाले, “कोरोनापासून वाचण्यासाठी आणि व्यवस्थेसाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन व आयुष राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांच्या व्हर्चुअल उपस्थितीत कोविड 19 च्या व्यवस्थेसाठी मंगळवारी आयुर्वेद आणि योग आधारीत राष्ट्रीय नैदानिक व्यवस्थापन प्रोटोकॉल जारी केला गेला. यानिमित्त नीति आयोगाचे उपाध्यक्ष डॉ राजीव कुमार आणि नीति आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही के पॉल व्हिडीओ कॉन्फरंसद्वारे उपस्थित होते.