आता Reliance तयार करणार ‘कोरोना’ची लस ! जाणून घ्या Updates

पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं गेल्या 7-8 महिन्यांपासून हाहाकार घातला आहे. जगभरातील कंपन्या कोरोनाच्या लसीसाठी प्रयत्न करत आहेत. आता लसीबद्दल नवीन माहिती समोर येत आहे. रिलायंस लाईफ सायंसेज कंपनीलाही कोरोनाची लस विकसित करण्यासाठी परवानगी मिळाली आहे. त्यामुळं लस निमिर्ती करणाऱ्या कंपन्यांमध्ये या कंपनीचाही समावेश झाला आहे. भारत बायोटेक, सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडिया, जायडस कॅडीला अशा कंपन्याही लस तयार करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्री आणि सरकारनं दिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी सुरुवातीच्या 3 महिन्यात कोरोनाच्या 2 लसी यशस्वीरित्या तयार होऊ शकतात. कोरोना लसीच्या शर्यतीत आता आणखी एका कंपनीची भर पडली आहे. ती म्हणजे रिलायंस लाईफ सायंसेज (RLS). मुकेश अंबांनी यांच्या रिलयांस इंडस्ट्रीजचे प्रतिनिधित्व करणारी ही कंपनी कोरोनाची लस तयार करणार आहे. या महिन्यापासून या लसीची प्राण्यांवरील प्री क्लीनिकल टेस्ट सुरू होणार आहे. रिलायंसनं जी नवीन लस तयार केली आहे ती रिकॉम्बिनेंट प्रोटीनबेस्ड कोविड लस आहे.

2021 च्या पहिल्या 3 महिन्यात या लसीच्या चाचणीचे परिणाम समोर येण्याची शक्यता आहे. कोरोना काळात या कंपनीकडून टेस्टींग किटसह लॅबोरेटरी उत्पादनं तयार केली गेली आहेत. आता लसीची निर्मिती, वितरण, यांकडेही कंपनीकडून लक्ष केंद्रीत केलं जात आहे.

WHO च्या प्रमुखांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्षाच्या शेवटापर्यंत कोरोनाची लस तयार होऊ शकते. सर्व देशांमध्ये या लस समान प्रमाणात पुरवण्याचा विचार आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख एडनॉम गेब्रियेसिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लस या वर्षाच्या शेवटापर्यंत उपलब्ध होऊ शकते. त्यांनी सांगितलं की, आपल्याला व्हायरससोबत लढण्यासाठी संपूर्ण ताकद लावायला हवी.