‘कोरोना’ संक्रमणामुळे वाढतेय ‘डोकेदुखी’ ! मानवी मेंदूमध्ये होताहेत ‘हे’बदल, तज्ञांना आढळली नवी लक्षणे

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   जगात कोरोना विषाणूचे संक्रमण हे लोकांसह अनेक देशांचीही डोकेदुखी झाली आहे. कोरोना विषाणूवर अद्याप कोणत्याही प्रकारची लस तयार झाली नसल्यामुळे अनेक लोकांचा मृत्यू यामुळे होत आहे. मात्र, कोरोनामुळे अनेक देशात लॉकडाऊन आणि अनलॉकचा पर्याय निवडून कोरोना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे. यात काही देश यशस्वी झाले आहेत. मात्र,जे देश कोरोना नियंत्रणात न आणू शकल्याने त्यांची आणखी डोकेदुखी वाढली आहे. मात्र, याच डोकेदुखीसारख्या विषयावर आता मनुष्याचा मेंदूवर कार परिणाम होतो, यावर अभ्यास करण्यास तज्ञांनी सुरुवात केली आहे. या कोरोनामुळे लोकांच्या मेंदूमध्ये कोणती नवी लक्षणं आढळून येतात? याचा अभ्यास केला जात आहे.

कोरोना विषाणूने गेल्या काही महिन्यांपासून जगभरात हाहाकार माजविला आहे. संक्रमणाच्या केसेस दिवसेंदिवस वाढत आहेत. लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता दिल्यानंतर आता कोरोना रुग्णांच्या संख्येत अनेक देशांमध्ये वाढ झालेली आढळून येत आहे. अलिकडे करण्यात आलेल्या संशोधनातून आढळले आहे की, कोरोना विषाणूमुळे रुग्णांच्या मेंदूला सूज येण्याची समस्या उद्भवत आहे. कोरोना विषाणूवर औषध आणि लस शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत आहेत, अशी माहिती ‘एम्स’चे डॉ. अजय मोहन यांनी कोरोना विषाणूंबाबत दिली आहे.

काही दिवसांपूर्वी तज्ज्ञांनी कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे न्यरोलॉजिकल डिसॉर्डर उद्भवत असल्याचा दावा केला होता. याबाबत तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या संक्रमणामुळे मेंदूला सूज येण्याची समस्या तीव्रतेने उद्भवत आहे. हे संशोधन ब्रेन नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित केले आहे. ज्या रुग्णांमध्ये कोरोना विषाणूची लक्षणे दिसून येत नाहीत. अशा रुग्णांनाही याचा धोका असू शकतो. शरीरात सुजेशी निगडीत असलेल्या समस्या कोरोना विषाणूच्या संक्रमणाने तीव्रतेने उद्भवत आहेत.

डॉक्टरांना मेंदूची सूज आणि डेलीरियम (मानसिक आरोग्याच्या समस्या) अधिक प्रमाणात आढळून आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार जास्तीत जास्त लोकांमध्ये न्यूरोलॉजिकल डिसॉर्डरची आणि मेंदूमध्ये सूज येण्याची समस्या उद्भवत आहे.

या संशोधनादरम्यान तज्ज्ञांना रुग्णांमध्ये डेलीरियम, ब्रेन डॅमेज, नर्व डॅमेज, ब्रेन इन्फ्लेमेशन आणि स्ट्रोकची समस्या आढळून आल्या आहेत. याबाबत डॉ. नबी वली यांनी सांगितले की, डोकेदुखी, मासंपेशीतील वेदना, थकवा येणे, अशक्तपणा येणे, अशा समस्या उद्भल्यास वेळ न घालवता त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधाला पाहिजे.

दरम्यान, कोरोना विषाणूचा धोका हा 13 ते 19 वयोगटातील मुलांना अधिक आहे, असे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. दक्षिण कोरियामध्ये सुमारे 65 हजार लोकांचा अभ्यास केला आहे. त्यानंतर संशोधनातून हा मोठा खुलासा झाला आहे.

याबाबत संशोधकांनी दिलेली माहिती अशी, 10 ते 19 या वयोगटामुळे सर्वात जास्त आणि जलद कोरोना विषाणूचा प्रसार होतो. 10 वर्षांच्या खालील वयोगटातील मुलांमुळे कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची संख्या कमी आहे.

तसेच कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लावल्यामुळे मानवांच्या स्वभावात बदल झाल्याचे आढळत आहे. त्यामुळे चीडचीड होते, नैराश्य येणे अशा केसेस आता समोर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे सरकारने विविध स्तरावर मानसोपचार तज्ञांची नेमणूक करून अशांना योग्य आणि चांगला सल्ला देण्याचे काम केले जात आहे. यामुळे लोकांची मानसिक स्थिती चांगली ठेवण्याचाही प्रयत्न केला जात आहे.