coronavirus Vaccine : ‘कोरोना’चं वॅक्सीन मिळाल्यानंतर देखील भारतात लसीकरणासाठी लागणार 2 वर्ष, शास्त्रज्ञांचा दावा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   भारतात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आतापर्यंत देशात १२ लाखांच्या लाखांच्या वरती लोकांना याची बाधा झाली आहे. तसेच जगभरातील ८० संस्था १२० लशींवर काम करत आहेत. यामध्ये ऑक्सफोर्ड विद्यापीठ कोरोना संसर्ग लस तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी तयारीत आहे. देशातील वैद्यकीय तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, ही लस लवकरच तयार केली असती तरी भारतातील ६० ते ७० टक्के लोकसंख्येच्या लसीकरणासाठी किमान दोन वर्षे लागतील. ‘हर्ड इम्युनिटी’ सुनिश्चित करण्यासाठी किमान ६० ते ७० टक्के लोकांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवणं आवश्यक आहे.

डिसेंबर अखेर आपल्याला लस मिळाली तर…

मॅक्स हेल्थकेअरचे डॉक्टर संदीप बुधीराजा यांनी एका वृत्तपत्राला बोलताना सांगितले की, ‘जर आपण दिलेल्या प्रोटोकॉलचे पालन केले, तर आपल्याला ६० ते ७० टक्के लोकसंख्येची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी लसीकरण करण्याची गरज आहे. जरी आम्हाला डिसेंबर अखेरपर्यंत कोरोना संसर्गावरील लस प्राप्त झाली. तर भारतातील ६० टक्के लोकसंख्येपर्यंत लसीकरण करण्यासाठी एक ते अडीच वर्ष कालावधी लागेल.’

बाकींच्या आजारांप्रमाणे कोरोनासोबत जगावं लागेल

त्यांनी सांगितल्यानुसार, जसे आपण टीबीसारख्या आजराशी झगडत जगलो, तसेच देशाला कोरोना संसर्गासोबत जगावे लागेल. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, भारतात सार्वत्रिक लसीकरण आधीपासूनच एक मोठे आव्हान आहे. दिल्ली-एनसीआरमधील कोविड रुग्णालय चालवणारे आकाश हेल्थकेअरचे डॉक्टर आशिष चौधरी यांनी म्हटलं की, ‘सरकारी अहवालानुसार, सर्व प्रयत्न करुनही त्या गटातील ६० टक्क्यांपेक्षा जास्त लस २ वर्षाखालील मुलांमध्ये अनिवार्य प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी द्यावी लागेल.’

कोरोना संसर्ग सतत बदलतोय रुप, एक लस मुळीच प्रभावी ठरणार नाही

एकाच लसीबाबत शंका निर्माण होते, जी सर्वांसाठी उपयुक्त ठरेल. टेलिमेडिसीनला भारतात एक नवीन ओळख देणारे अपोलो टेलीहेल्थचे गणपती म्हणतात, “डिसेंबर २०१९ ते जून २०२० पर्यंत या संसर्गाने रूप बदलेल आहे. आता स्पेनमध्ये त्याचे रूप कसे होते, इटलीमध्ये त्याचे रूप कसे होते आणि भारतात त्याचे रूप कसे आहे यावरही सर्व काही अबलंबून आहे. आमची प्रतिकारशक्ती वेगळी आहे.’

कोरोना संसर्गाचे ६ ट्रेन्स, एकाच वेळी एक लस एका ट्रेन्सवर ठरेल प्रभावी

कोरोना संसर्गाचे ६ प्रकार आहेत आणि एका वेळी केवळ एकाच ट्रेन्सविरुद्ध ही लस प्रभावी ठरेल. लस सर्वाना उलपब्ध असल्याबाबत तज्ज्ञांना शंका आहे. इतर स्ट्रेन्सच्या वापरासाठी लसमध्ये काही बदल आवश्यक आहेत. २० वर्षांपूर्वी आलेल्या SARS वर अद्याप लस उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे कोरोना संसर्गावर लस लवकरच तयार होईल की नाही, याची तज्ज्ञांना खात्री नाही. डॉ. गणपती यांनी म्हटलं की, आमच्याकडे अद्याप सार्स विषाणूवरती लस तयार झालेली नाही, जी साथ २० वर्षांपूर्वी प्रथम पसरली होती.