NBA चे दिग्गज पॅट्रिक ईव्हिंग ‘कोरोना’ पॉझिटीव्ह, म्हणाले – ‘यास सहजतेने घेऊ नका’

जॉर्ज टाऊन : वृत्त संस्था  – एनबीएचे दिग्गज पॅट्रिक ईव्हिंग यांनी एक ट्विट करून आपण कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती दिली आहे. यासाठी त्यांनी आपल्या अधिकृत हँडलवरून एक ट्विट केले. जॉर्ज टाऊनमध्ये पुरुषांच्या बास्केटबॉल टीमचे कोच आणि एनबीएचे माजी स्टार पॅट्रिक ईव्हिंग यांनी ट्विट करून आपण कोविड-19 ची टेस्ट केली होती, जिचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असल्याचे म्हटले आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले, मला सांगायचे आहे की , मी कोविड-9 पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा व्हायरस गंभीर आहे आणि यास सहजतेने घेऊ नका. मी सर्वांना सांगतो की, स्वत: सुरक्षित राहा आणि आपल्या प्रिय व्यक्तींची सुद्धा काळजी घ्या.

जॉर्जटाऊन विश्वविद्यालयाने आपल्या एका वक्तव्यात म्हटले आहे की, पॅट्रिक ईव्हिंग यांना एका स्थानिक हॉस्पिटलमध्ये विलगिकरणात ठेवून काळजी घेतली जात आहे. ते जॉर्जटाऊनच्या पुरुष बास्केटबॉल टीमचे एकमेव सदस्य आहेत, जे कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत.

You might also like