तज्ज्ञांचा दावा : व्हायरसशी लढण्यासाठी ‘कोरोना’ची सुपर वॅक्सिन तयार करणार

पोलीसनामा ऑनलाइन – जगभरात कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या ४ कोटी ९ लाख ३५ हजार १४६ वर गेली आहे. तर तब्बल १२ लाख ३९ हजार ६६५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जगभरातील संशोधक कोरोना प्रतिबंधक लस आणि औषध शोधण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. त्यातच आता अमेरिकेतील वैज्ञानिकांनी कोरोना संसर्गाला लढण्याकरता परिणामकारक अशी लस तयार केल्याचा दावा केला आहे. त्यांनी केलेल्या दाव्यानुसार लस लोकांच्या शरीरात कोरोना संसर्गाशी लढण्यासाठी तसेच एंटीबॉडी तयार करण्यासाठी प्रभावी ठरत आहे.

सेल जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित करण्यात आले आहे. त्यात म्हटलं आहे की, ही लस नॅनो पार्टिकल्सने तयार केली असून, त्याचे प्राण्यांवरील परीक्षण यशस्वी झाले आहे. संशोधन करताना वैज्ञानिकांना दिसले की, ही लस कोरोनातून बरे झालेल्या लोकांच्या तुलनेत जास्त न्यूट्रीलायजिंग एंटीबॉडी विकसित करण्यासाठी परिणामकारक ठरली होती. उंदराला लसीचा डोस ६ टक्क्यांनी कमी केल्यानंतरही १० टक्के जास्त न्यूट्रीलायजिंग एंटीबॉडीज तयार करण्यात झाल्या होत्या. तसेच लसीत प्रभावशाली बी सेल्स इम्युन रिस्पाँस देखील दिसून आला. ही लस दीर्घकाळ परिणामकारक ठरु शकते, असा दावा वैज्ञानिकांनी केला.

या लसीचे माकडांवरही परीक्षण करण्यात आले. ज्या माकडांना ही लस टोचवली गेली होती, त्याच्या एंटीबॉडीने कोरोना संसर्गाच्या स्पाईक प्रोटीन्सवर आक्रमण केले होते. स्पाइक प्रोटीनच्या मार्फत कोरोना माणसाच्या शरीरातुन पेशीत प्रवेश करतो. वैज्ञानिकांनी सांगितले की, कोरोनाने आपले स्वरूप बदले तरीसुद्धा ही लस परिणामकारक ठरेल. ही लस स्पाइक प्रोटीन्सच्या रिसेप्टर बायडिंग डोमेनच्या ६० टक्के भागावर परिणामकारक ठरते.