Coronavirus : त्वचेवरील ‘त्या’ डागांकडे करू नका दुर्लक्ष, समोर आलं ‘कोरोना’चं नवीन लक्षण ! लागण झाल्यास होतो ‘असा’ त्रास

पोलिसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत आता भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ब्रिटेनच्या वैद्यकीय तज्ञांनी आता कोरोनाच्या नवीन लक्षणाबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. याशिवाय नॅशनल हेल्थ सर्व्हीसनं कोरोनाच्या लक्षणांमध्ये या नवीन लक्षणाचा समावेस करावा यासाठी निवेदनही दिलं आहे.

सर्वात आधी तज्ञांनी कोरोनाच्या लक्षणांवर अभ्यास केला. यात असं समोर आलं की, 11 पैकी एका रुग्णाच्या त्वचेवर लाल चट्टे येण्याची समस्या उद्भवली होती. त्वचेवर येणारे लाल चट्टे हेही कोरोनाचं लक्षण असू शकतं असं तज्ञांनी सांगितलं आहे. याशिवाय या अभ्यासातील प्रमुख संशोधक डॉ मारियो फाल्ची यांनीही अशी माहिती दिलीय की, कोरोनाच्या रुग्णांना अनेक आठवड्यांपर्यंत या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

या अभ्यासाबद्दल बोलायचं झालं तर किंग्स कॉलेज लंडनच्या 20 हजार लोकांवर हे संशोधन झालं होतं. यात कोरोनाची लागण झालेली लोकं होती. यात असं दिसून आलं की, 9 टक्के लोकांना त्वचेवर चट्टे येणं या समस्याचा सामना करावा लागला होता. तसेच 8 टक्के लोकं अशी होती ज्यांना कोरोनाच्या इतर लक्षणांसोबत लाल चट्टे येण्याची समस्या होती.