आता फ्लू आणि श्वसनासंबंधीच्या रूग्णांची द्यावी लागेल माहिती, राज्य सरकारांना लवकरच निर्देश देणार केंद्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  सरकार फ्लू (आयएलआय) आणि गंभीर श्वास रोगांनाही अधिसूचित आजारांमध्ये समाविष्ट करण्याच्या तयारीत आहे. दिल्लीतील आरएमएल हॉस्पिटलच्या अभ्यासातून हा खुलासा झाला आहे की, फ्लू आणि श्वासाच्या गंभीर रूग्णांना संसर्गाचा सर्वाधिक धोका असतो. अधिसूचित झाल्यानंतर राज्यांना टीबी आणि मलेरियाप्रमाणे इतर गंभीर रूग्णांची माहितीसुद्धा केंद्राला द्यावी लागेल.

अधिकृत सूत्रांच्या माहितीनुसार, रूग्णांच्या ओळखीसाठी राज्यांमध्ये हे अभियान सुरू करण्यात येणार आहे. आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत इंटीग्रेटेड डिसीज सर्व्हिलान्स प्रोग्रामअंतर्गत दिशा-निर्देशांवर काम सुरू आहे. यापूर्वी 2010मध्ये स्वाईन फ्लूला सुद्धा नोटीफाय करण्यात आले होते. दोन्ही रोग थेट कोरोनाशी संबंधित आहेत.

आयसीएमआरच्या इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये सारी आणि आयएलआय रूग्णांमध्ये 1.8 टक्के संसर्ग असल्याचे आढळले होते. आता आरएमएलला रूग्णांमध्ये 39 टक्के संसर्ग आढळला आहे. 2 जुलैपर्यंत कोरोनामुळे अशा 43 टक्के लोकांचा मृत्यू केवळ संसर्गामुळे झाला आहे. त्यांच्यामध्ये अगोदरपासून आजार नव्हता.

तर 21 मेपर्यंत देशात 70 टक्के मृत्यू त्या लोकांचा झाला, ज्यांना अगोदरपासून डायबिटीज, हायपरटेंशन होते. 2 जुलैपर्यंत 17,834 पैकी 15,962 मृत्यूंची माहिती उपलब्ध आहे. दिल्ली, यूपी व महाराष्ट्राकडून रोज माहिती मिळत नाही. 57 टक्के मृत्यू अशा रूग्णांचे नोंदण्यात आले आहेत, ज्यांना हार्ट, किडनी, डायबिटीज, हायपरटेंशनसह अन्य रोग होते. व्हायरसच्या संसर्गाने मृत्यू झालेल्यांमध्ये पुरूष 68 टक्के होते.

75 वयातील 12.88 टक्के मृत्यू

देशात आतापर्यंत 14 वर्षांपेक्षा कमी 0.54, 15 ते 29 च्या दरम्यान 2.64, 30 ते 44 च्या दरम्यान 10.82, 45 ते 59 च्या दरम्यान 32.79 आणि 60 ते 74 वर्ष वयाचे 39.02 टक्के मृत्यू झाले आहेत. याशिवाय 75 किंवा त्यापेक्षा जास्त वयोगटातील कोरोना संक्रमित 12.88 टक्के रूग्णांचा मृत्यू झाला आहे.