सॅनिटायजरमधील ‘हा’ पदार्थ ठरू शकतो ‘घातक’ ! वेळीच व्हा सावध

पोलिसनामा ऑनलाइन – एका रिपोर्टनुसार अमेरिकेतील न्यू मेक्सिकोमध्ये सॅनिटायजर पिल्यानं अनेकांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅनिटायजरमधील मिथेलॉनमुळं 3 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 3 लोक मृत्यूशी झुंज देत आहेत. या 6 लोकांनीही मिथेनॉलयुक्त हँड सनिटायजर पिलं असावं किंवा याचा हातांवर अतिवापर केला असावा.

मिथेनॉल बेस्ड हँड सॅनिटायजरचे अनेक दुष्परिणाम आहेत. एफडीए (फूड अँड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) नुसार लोकांना मेक्सिकोमधील कपंनी एस्किबोचेम एसएने निर्माण केलेल्या 9 प्रकारच्या सॅनिटायजरपासून लांब राहण्याची आवश्यकता आहे. सॅनिटाजरमध्ये मिथेनॉल हा विषारी पदार्थ असतो. यामुळंच उलटी होणं, चक्कर येणं, धुसर दिसणं अशा शारीरिक दुष्परिणामांचा सामना करावा लागू शकतो.

याशिवाय जेव्हा आपण हाताला सॅनिटायजर लावतो तेव्हा विषारी पदार्थ जर त्वचेमार्फत शरीरात गेले तर अनेक समस्या येऊ शकतात. यासाठी तुम्ही सॅनिटायजरच्या बाटलीवरील डिस्क्रिप्शन वाचणं गरजेचं आहे. जर तुमच्याकडे साबण आणि पाणी उपलब्ध असेल तर अशा वेळी सॅनिटायजर वापरणं टाळायला हवं. हात किमान 20 सेकंद तरी हात धुवावेत. तज्ज्ञ सांगतात की, किटाणूंपासून वाचण्यासाठी 20 सेकंदांपर्यंत साबणानं हात धुणं हा सर्वात चांगला उपाय आहे. कारण सॅनिटायरच्या तुलनेत साबण आणि पाणी कधीही चांगलं आहे.

जर तुम्ही सतत सॅनिटायजरचा वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा. म्हणून तज्ज्ञ सांगतात की, गरज असेल तेव्हाच सॅनिटायजरचा वापर करावा. महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही काही वेळापूर्वीच हात धुतले असतील तर अशात लगेच सॅनिटायजरचा वापर करू नका.

टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.