Pune : पुण्यात ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे 40 ते 50 रुग्णालयांनी कोरोना रुग्णांची थांबविली ‘भरती’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  पुण्यात कोरोना रुग्णसंख्येचा आकडा अधिक प्रमाणात वाढत आहे. रुग्णाची संख्या वाढल्याने अणे आरोग्याच्या सोयी आणि ॲाक्सिजनचा पुरवठा कमी पडू लागला आहे. यामुळे आता एक धक्कादायक माहिती पुढं आलीय. पुणे शहरातील तब्बल ४० ते ५० छोट्या रुग्णालयांनी ऑक्सिजन पुरवठा उपलब्ध नसल्याने कोरोना रुग्णांना दाखल करून घेणे थांबविले आहे. या प्रकरणावरून आरोग्य सेवेत गोंधळ निर्माण झाला आहे.

अगोदरच कोरोनाबाधितांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यात या रुग्णावर उपचार करण्यासाठी सुविधा कमी पडू लागल्या आहेत. पुणे शहरात मागील २ दिवसांपासून ॲाक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. या ॲाक्सिजनच्या तुटवड्यामुळे रुग्णालयांवर कोरोना रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात शिफ्ट करण्याची वेळ आली होती. मात्र अडचण असतानाही ऑक्सिजन मिळत नसल्याने आता शहरातील छोट्या रुग्णालयांनी कोरोना रुग्ण दाखल करून घेणे थांबविले आहे. या रुग्णालयात प्रवेश न देता तेथील दुसऱ्या (मोठ्या) रुग्णालयाचा सल्ला देत आहे. तसेच पुण्यातील १२० रुग्णालयापैकी ४० ते ५० रुग्णालयात अशी परिस्थिती बघायला मिळत आहे.

दरम्यान, ऑक्सिजन अभावी रुग्णाचे व्यवस्थापन करण्यास अडचण निर्माण झालीय. जर हॉस्पिटल मधून रुग्णाला शिफ्ट करायची वेळ आली तर नातेवाईकांकडून तोडफोड करण्याचे प्रकारही घडले आहेत. त्यामुळे या छोट्या रुग्णालयांनी रुग्णांना भरती न करण्याचा निर्णय घेतला आहे. असे पुण्यातील हॉस्पिटल बोर्ड ॲाफ इंडियाचे चेअरमन डॉ. संजय पाटील यांनी माहिती दिली आहे. तसेच, ते म्हणाले, प्रशासनाने आज ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होईल, असे आश्वासन दिले आहे. यानंतर पुन्हा या लहान रुग्णालयांमध्ये काही प्रमाणात रुग्णांना दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरु होईल.