परिवहन मंत्री अनिल परब यांना ‘कोरोना’ची लागण ! रुग्णालयात दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यातील महाविकास आघाडीमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची बाधा झाली आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना कोरोना झाला आहे. आतापर्यंत राज्यातील जवळपास 9 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यात राष्ट्रवादीचे 3, काँग्रेसचे 3 आणि शिवसेनेचे 2 तर एका अपक्ष मंत्र्याला कोरोना झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अनिल परब यांची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे. सध्या अनिल परब यांना उपचारांसाठी लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. विशेष बाब अशी की, काल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व विभागप्रमुखांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत अनिल परब देखील उपस्थित होते.

‘या’ 9 मंत्र्यांनी केली ‘कोरोना’वर मात

राज्यातील महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, कामगार व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनाही कोरोनाची लागण झाली होती. परंतु या सर्वांनी कोरोनावर मात केली असून ते सध्या मंत्रिमंडळात काम करत आहेत.