COVID-19 : धूम्रपानामुळं ‘कोरोना’चा धोका कमी नाही होत, घ्या समजून Corona

पोलीसनामा ऑनलाइन टीम – धुम्रमान करणाऱ्याला कोरोनाचा धोका आणि त्यामुळं मृत्यूची शक्यता कमी होते असा निष्कर्ष फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या एका अभ्यासात काढण्यात आला होता. परंतु याच्या काही त्रुटी असल्याचं समोर आलं आणि जागतिक आरोग्य संघटनेनं असं काही मानण्यासाठी नकार दिला. याला कोणताही संशोधनात्मक आधार नसल्याचंही जागतिर आरोग्य संघटनेनं सांगितलं. धुम्रपानामुळं कोरोनाचा धोका कमी होत नाही असंही या संघटनेनं जाहीर केलं आहे.

फ्रान्स मीडियात अशा बातम्या छापून आल्यानंतर तेथील धम्रपानाचं प्रमाण वाढलं होतं. तिथल्याही वैद्यकीत तज्ज्ञांनी नंतर स्पष्ट केलं होतं की, हा अभ्यासही अपूर्ण आहे. कारण या अभ्यासात फक्त 482 लोकांचा समावेश होता. कोणताही निष्कर्ष काढण्यासाठी ही संख्या खूप कमी आहे. काहींनी आधीच धुम्रपान सोडलं होतं परंतु यांचाही समावेश बरे झालेल्यांमध्ये करण्यात आला होता. अजूनही या अभ्यासाची कोणती पडताळणी झालेली नाही. उत्साहाच्या भरात माध्यमात हा छापून आला आणि जगभर पसरला.

जर कोणी धुम्रपान करत असेल तर या भ्रमात राहू नका की, तुम्हाला कोरोना होणार नाही. उलट तुम्हाला जंतुसंसर्गाचा धोका जास्त आहे. कारण धुम्रपान केल्यानं फुप्फुसांना इजा झालेली असते. याशिवाय मधुमेह, हृदयरोग आणि फुप्फुसाचा कॅन्सर यांचा धोकाही जास्त असतो. उलट कोरोनाच्या काळात तुम्हाला धुम्रपान सोडण्याची चांगली संधी आहे.