Coroanavirus : पुणे शहरात आज 163 तर पिंपरीत 103 नवे ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्ण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे शहरातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये सोमवारी (दि.21) 163 रुग्णांची वाढ झाली. तर दिवसभरात 252 रुग्णांना घरी सोडण्यात आले. शहरातील विविध रुग्णालयातील 388 क्रिटिकल रुग्णावर उपचार सुरु असून दिवसभरात 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 3 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. पुण्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 5 हजार 098 इतकी झाली आहे.

उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 390 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून यातील 226 रुग्ण व्हेंटिलेटरवर असून 164 रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. आज दिवसभरात 7 रुग्णांचा मृत्यू झाला असून शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 4 हजार 581 इतकी झाली आहे. दिवसभरात 252 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत 1 लाख 66 हजार 549 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर एकूण रुग्णसंख्या 1 लाख 76 हजार 228 झाली आहे. शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या 5 हजार 098 इतकी आहे. आज शहरातील विविध केंद्रावर 1 हजार 862 स्वॅब तपासणी करण्यात आली.

पिंपरीत 103 जण ‘कोरोना’ पॉझिटिव्ह
पिंपरी :
पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून आज दिवसभरात 103 नव्या रुग्णांची भर पडली आहे. शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 95 हजार 436 वर पोहचली आहे. शहरात आज दिवसभरात 3 रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज 98 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत 91 लाख 954 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

शहरामध्ये सध्या 748 रुग्ण ॲक्टिव्ह असून त्यांच्यावर कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत. शहरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 2451 इतकी झाली असून यामध्ये 1737 शहरातील तर 714 हद्दीबाहेरील रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये हद्दी बाहेरील 94 रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर शहरातील 130 रुग्णांवर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.