निर्भया केस : सध्या कोरोनाचा ‘हाहाकार’ ! फाशी देण्यासाठी योग्य वेळ नाही, दोषींचा नवा ‘डाव’

पोलिसनामा ऑनलाईन टीम – कोरोना वायरसचा गैरपारदा घेत निर्भया सामूहिक बलात्काराच्या दोषींनी नवी शक्कल लढविली आहे. त्यांना फासावर लटकवण्यासाठी आता काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. मात्र फाशी टळावी यासाठी आरोपी अजूनही प्रयत्न करीत आहेत. चारही आरोपींनी फाशी रद्द व्हावी यासाठी दिल्लीमधील पटियाला कोर्टात याचिका दाखल केली असून फाशी रोखण्याची मागणी केली आहे. याचिकेत दोषींनी वेगवेगळे दावे केले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये त्यांनी कोरोनाचा हवाला देत सध्या फाशी देण्यासाठी योग्य वेळ नसल्याचे नमूद केले आहे.

निर्भयाच्या चारही दोषींना फासावर लटकवण्याची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. अक्षय ठाकूर वगळता इतर तीन दोषी पवन, विनय आणि मुकेश यांच्या कुटुंबीयांनी शेवटची भेट घेतली आहे. फाशी देण्यासाठी कारागृहात पूर्ण तयारी करण्यात आली आहे दोषी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुरुवारी दिवसभर न्यायालयीन कामकाज सुरु ठेवले जाऊ शकते. निर्णय येण्यासाठी रात्र होऊ शकते. पण आता फाशी रद्द होणं अशक्य असल्याचं दिसत आहे.

कारण दोषींसमोरील सर्व पर्याय संपले आहेत. मुकेश सिंह (32), पवन गुप्ता (25), विनय शर्मा (26) आणि अक्षय कुमार सिंह (31) या चौघांना 20 मार्चला, शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता फाशी देण्यासाठी डेथ वॉरंट यापूर्वीच जारी करण्यात आले आहेत. मुकेश सिंहच्या याचिकेवर दिल्ली न्यायालयाचा निकाल राखून 16 डिसेंबर 2012 रोजी दिल्लीतील सामूहिक बलात्कार व खुनाचा गुन्हा घडला, त्या दिवशी आपण राष्ट्रीय राजधानीत नव्हतो हा या गुन्ह्यात दोषी मुकेश सिंह याचा दावा कनिष्ठ न्यायालयाने फेटाळून लावल्यानंतर; या निर्णयाला आव्हान देणार्‍या त्याच्या याचिकेवरील आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी राखून ठेवला. दोषी मुकेश सिंह आणि दिल्ली सरकार या दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्या. ब्रिजेश सेठी यांनी आदेश राखीव ठेवला.कनिष्ठ न्यायालयाने मुकेशची याचिका फेटाळून लावली होती आणि त्याच्या वकिलांना योग्य ती समज द्यावी, असे बार कौन्सिल ऑफ इंडियाला सांगितले होते.