Coronavirus : ना मास्क, ना सोशल डिस्टेन्सिंग ! ज्या वुहानमध्ये झाली होती ‘कोरोना’ची सुरूवात, तिथं चालताहेत फूल टू पाटर्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसचा हाहाकार माजला आहे. बरेच देश लॉकडाऊनला सामोरे जात आहेत. या दरम्यानच्या काळात वुहानमधून एक चित्र समोर आले आहे. तेच वुहान जिथे मागच्या वर्षी कोरोना व्हायरसची सुरुवात झाली होती. वुहानच्या या चित्रात लोक वॉटर पार्कमध्ये पूल पार्टी करताना दिसत आहेत. वुहानमधील या उद्यानात ना मास्क आहे, ना सोशल डिस्टंसिंग आहे, फक्त लोक आहेत आणि खूप सारी मजा आहे.

उद्यानाच्या क्षमतेच्या ५० टक्के होती गर्दी

वुहानमधील माया बीच वॉटर पार्कच्या इलेक्ट्रॉनिक म्युझिक फेस्टिवलमध्ये मोठ्या संख्येने लोक स्विमिंग सूट आणि गॉगल घातलेले दिसले. तेथे बरेच जण रबर डाईन्सवर बसले होते आणि काही लोक पाण्यात होते. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, पार्कमध्ये पार्टी करणार्‍यांची गर्दी सर्वसाधारण क्षमतेच्या ५० टक्के इतकी होती, तसेच उद्यानात महिलांच्या प्रवेशासाठी ५० टक्के सूटदेखील देण्यात आली होती.

पार्कमध्ये उपस्थित काही लोकांना लाइफ जॅकेट्सही दिले गेले होते, पण कोणीही मास्क परिधान केलेले दिसले नाही. लोक पार्टीमध्ये भरपूर एन्जॉय करताना दिसले आहेत. पार्कमधील स्टेज शोमध्ये एका कलाकाराने गर्दीसमोर आपला फोटो घेतला, तर आणखी एका कलाकाराने स्पार्क्स शूटिंगसह लोकांचे मनोरंजन केले.

७६ दिवसांच्या लॉकडाऊननंतर उघडले उद्यान

महत्वाचे म्हणजे की, गेल्या वर्षी चीनच्या ११ कोटी लोकसंख्या असलेल्या वुहानमध्ये कोरोना व्हायरस संसर्गाचे पहिले प्रकरण समोर आले होते. ७६ दिवसांच्या कडक लॉकडाऊननंतर हे उद्यान जूनमध्ये पुन्हा उघडण्यात आले आहे. नवीन प्रकरणांची संख्या कमी झाल्यानंतर हुबेई सरकार प्रांतामधील ४०० पर्यटन स्थळांवर विनामूल्य प्रवेश देऊ करत आहे.