Coronavirus : काय सांगता ! होय, नोएडातील एका कार्पोरेट कंपनीमध्ये तब्बल 24 जणांना ‘कोरोना’ची लागण

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – देशात कोरोनाने कहर केला आहे त्याच परिस्थितीत आता नोए़़डातून एक धक्कादायक बातमी येत आहे. नोएडातील सेक्टर 1 मध्ये सीजफायर कंपनीला नोएडा जिल्हा प्रशासनाने पुढील आदेशापर्यंत टाळे ठोकले आहे. नोएडातील कोरोनाची वाढती संख्या आटोक्यात येत नसल्याने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हाधिकाऱ्यांची कानउघडणी केली होती. यावेळी या जिल्हाधिकाऱ्याने सुट्टीवर पाठवण्याची मागणी केली त्यानंतर योगींनी नव्या तरुण तडफदार जिल्हाधिकाऱ्याची त्या ठिकाणी नियुक्ती केली.

आज एका कंपनीवर मोठी कारवाई करण्यात आला. या कंपनीचाच संचालक कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्यामुळे त्या कंपनीतील 24 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. एवढेच नाही तर याच कंपनीचे काही गाझियाबाद आणि फरिदाबादचे कर्मचारी देखील कोरोनाग्रस्त आहे, हे एवढे मोठे कोरोनाचे प्रकरण समोर आल्याने ही साखळी कशी शोधायची या विचाराने उत्तर प्रदेश सरकारचे धाबे दणाणले आहेत.

नोएडामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच आहे. सोमवारी एका दिवसात येथे 6 नवे रुग्ण आढळले. यात सीजफायर या कंपनीच्या संचालकाचा देखील समावेश आहे. तर 2 आणि 5 वर्षांच्या दोन मुलांना देखील कोरोना झाला आहे. नोएडामध्ये आतापर्यंत 38 कोरोनाग्रस्त आढळले असून उत्तर प्रदेशात नोएडात आढळलेल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा मोठा आहे.

सीजफायर कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. याचसह या कंपनीचे काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याच्या 82 वर्षीय आईला देखील कोरोना झाला आहे. एकट्या कंपनीत कोरोनाची 24 प्रकरणं आढळली. एका गावातील दुकानदार तरुणाला देखील कोरोनाची लागण झाली आहे. कंपनीचा एक कर्मचारी काही दिवसांपूर्वी इंग्लडहून परत आला होता. त्याच्यामध्ये कोरोनाची लक्षणं नव्हती परंतु आता तपासणीवेळी तो ही कोरोनाग्रस्त असल्याचे आढळले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like