Coronavirus : ‘कोरोना’चा धोका, रद्दीच्या भावानं विकलं जाणार तेल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोनाने कहर केला आहे, यादरम्यान लवकरच तेलासंबंधित समस्या गंभीर होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते जगात काही महिन्यात अतिरिक्त तेल जमा करण्याची जागाच राहणार नाही कारण जगभरातील तेलाची मागणी घटली आहे असे असताना सौदी अरब मात्र आपले तेलाचे उत्पादन वाढण्यावर भर देत आहे.

चीनने कोरोना पसरल्यानंतर जानेवारी महिन्यापासून मोठ्या औद्योगिक परिसरातील आपल्या अनेक रिफायनरी बंद केल्यानंतर जगभरातील तेल भंडार केंद्र जवळपास तीन चतुर्थांश भरले आहेत.
जगभरात कोरोनाच्या महामारी दरम्यान तेल उद्योग येणाऱ्या आठवड्यात आणि महिन्यात तेल स्टोरेज करत राहील, कारण अनेक देशात तेलासह तेथील प्राकृतिक स्त्रोतांमध्ये कमी येत आहे.

एनर्जी कंसल्टेंसी रिस्टॅड एनर्जीचे विश्लेषकांच्या मते, कॅनडामध्ये देशांतर्गत उत्पादनामुळे सारे तेल भंडार भरण्यास फक्त काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. लवकरच तेथे तेल भंडारमध्ये तेल साठवणूकीचा सामना करावा लागेल आणि जगातील बाकी देशांना देखील काही महिन्यात ही समस्या येणार आहे.

विश्लेषकांच्या मते पश्चिम कॅनडाला आपल्या तेल उत्पादनात 400,000 बॅरेल प्रति दिवस अशी घट करावी लागेल. रिस्टॅडचे एक विश्लेषक थॉमस लिलीज यांच्या मते यंदा रेल्वेद्वारे कच्चे तेल निर्यात करण्यात बरीच कमी येऊ शकते.याशिवाय अनेक ऑइल सॅड्स मायनिंग प्रोजेक्ट देखील स्थगित होतील.
जगभरातील तेल उद्योग तेल टॅंकरमध्ये अतिरिक्त कच्चे तेल जमा करण्याचा विचार करु शकतात परंतु हे आर्थिक रुपात यशस्वी करण्यासाठी तेलाच्या किंमतीत आणखी घसरण होण्याची आवश्यकता आहे.

मागील आठवड्यात तेलाच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे. तेल 25 डॉलर प्रति बॅरलने विकले जात आहे. वर्षाच्या सुरुवातील याची किंमत 65 डॉलरपेक्षा जास्त होती. मागील आठवड्यापासून 30 डॉलरच्या खाली प्रति बॅरेलच्या किंमती गेल्या आहेत. रिस्टॅडने इंटस्ट्रीला चेतावणी दिली की तेलाच्या किंमती यंदाच्या वर्षी 10 डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहोचू शकतात.

विश्लेषकांच्या मते सौदी अरबच्या जहाजांच्या बुकींग नंंतर कमी खर्चात तेलाचे संकलन करणं अवघड झाले आहे. मागील तीन आठड्यापासून शिपिंग सर्विसेजच्या किंमती गगनाला भिडू लागल्या आहेत.
जगभरात पुढील महिन्यात मागणीच्या तुलनेत तेलाचा पुरवठा आणखी वेगाने वाढण्याची शक्यता आहे कारण ओपेक आणि रशियाच्या दरम्यान तेल उत्पादन स्थगित करण्याचा करार संपणार आहे. हा करार संपल्यानंतर ओपेकचे वास्तविक नेता सौदी अरब बाजारात आपली हिस्सेदारी वाढण्यासाठी तेल उत्पादनात रशियाशी रेस करेल.

तेलाच्या किंमतीवरुन युद्ध सुरु असल्याने जगभरातील तेल उत्पादन प्रति दिन 25 लाख बॅरल पर्यंत वाढू शकते. यामुळे प्रति दिन तेलाची मागणी जवळपास 60 लाख बॅरलपेक्षा जास्त तेलाची अपूर्ती होईल.
रिस्टॅडचे विश्लेषकांच्या मते, जगभरातील तेल संकलन सुविधा केंद्र जवळपास 7.2 अरब बॅरल कच्चा तेल आणि पेट्रोलियम उत्पादन जमा आहे, यातील समुद्रे तेल टँकरमध्ये 1.3 अरब पासून 1.4 अरब बॅरलपर्यंत क्रूड ऑइल जमा आहे.

सैद्धांतिक पद्धतीने जगभरात तेल भंडार भरण्यासाठी 9 महिन्यांचा वेळ लागतो परंतु अनेक समस्यामुळे हे तेल भंडार लवकर भरतील. रिस्टॅड एनर्जीचे विश्लेषक पाओला रोड्रिगेड मासियु यांच्या मते, स्टोरेज भरण्याचा सध्याचा दर पाहता तेलाच्या किंमतीत कोणतीही वाढ होईल असे सांगता येत नाही जसे 1998 साली झाली होती. त्यावेळी कच्चा तेलाच्या किंमतीत सर्वात मोठी घसरण झाली होती आणि किंमती 10 डॉलर प्रति बॅरलच्या खाली आल्या होत्या.