Coronavirus Omicron Infection | एखाद्या संक्रमित व्यक्तीला न भेटताही असे होऊ शकता कोविड पॉझिटिव्ह, जाणून घ्या कारणे

0
99
Coronavirus Omicron Infection | reasons how yo can catch covid 19 virus without meeting an infected person
file photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Coronavirus Omicron Infection | प्रत्येकजण सध्या भारतात कोविड-19 च्या तिसर्‍या लाटेशी (Covid-19 Third Wave) झुंज देत आहे. अशा स्थितीत प्रत्येकाला सतावणारा प्रश्न असा आहे की, कोणत्याही कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात न येता त्यांना कोरोना व्हायरसची लागण कशी होत आहे. हे सर्वज्ञात आहे की कोरोना व्हायरस एका संक्रमित व्यक्तीपासून दुसर्‍या व्यक्तीमध्ये पसरतो. अशा परिस्थितीत हा व्हायरस पसरत असलेल्या इतर कारणांबद्दल जाणून घेऊया. (Coronavirus Omicron Infection)

 

1. लक्षणे दिसण्यापूर्वीची स्थिती
लक्षणे दिसण्यापूर्वी 2-3 दिवस आधी कोविडची लागण झालेले लोक जास्त सांसर्गिक असतात. ’प्री-सिम्प्टोमॅटिक’ अशी स्थिती, जेव्हा एखाद्या व्यक्तीला व्हायरसची लागण झालेली असते परंतु तो अद्याप विकसित झालेला नसतो, म्हणजेच संसर्ग होणे आणि लक्षणे विकसित होण्याच्या दरम्यानच्या कालावधीला ’लक्षण-पूर्व’ म्हणतात.

तुमच्या जवळची पूर्व-लक्षणे स्थितीत असलेली व्यक्ती संक्रमित व्यक्तीसारखीच संसर्गजन्य असते आणि संसर्ग पसरवण्यास सक्षम असते.

 

2. कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीच्या जवळपास
जर तुम्ही कोविड पॉझिटिव्ह असलेल्या एखाद्याच्या आसपास असाल तर तुम्हालाही सहज संसर्ग होईल. कोरोना व्हायरस संक्रमित व्यक्तीच्या खोकण्याने, शिंकण्याने, बोलणे किंवा श्वास घेण्याद्वारे पसरतो. (Coronavirus Omicron Infection)

जर तुम्ही एखाद्या संक्रमित व्यक्तीजवळ उभे असाल तर त्याच्या तोंडातून निघालेले अतिसुक्ष्म थेंब तुमच्या तोंडातून, डोळ्यातून किंवा नाकातून सहज आत जाऊ शकतात. जेव्हा तुम्ही हवेशीर नसलेल्या किंवा गर्दीच्या ठिकाणी असता तेव्हा तुम्हाला हा संसर्ग होण्याची शक्यता वाढते.

 

3. लक्षणहीन वाहक
ज्या व्यक्तीला कोविड-19 आहे परंतु लक्षणे दिसत नाहीत, अशा व्यक्तीला लक्षणे नसलेली म्हणजेच असिम्प्टोमॅटिक असे म्हटले जाते. या लोकांना स्वतःला संसर्ग झाल्याचे माहीत नसते.

त्यामुळे तुम्ही लक्षणे नसलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास, तुम्हालाही संसर्ग होऊ शकतो. लक्षणे नसलेल्या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा अर्थ असा नाही की तुम्हालाही लक्षणे नसतील.

4. चाचणीचा अभाव
कोविड-19 चा रूग्ण शोधण्याचा एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे चाचणी. कारण कोरोनाची लक्षणे इतर अनेक आजारांसारखीच असतात,
असे लोक जास्त आहेत जे कोविडची लागण झालेली असतानाही सामान्य फ्लू सारख्या लक्षणांवर उपचार करतात आणि कोविड चाचणी करून घेत नाहीत.
अशा स्थितीत, जोपर्यंत त्या व्यक्तीची सर्दी बरी होत नाही, तोपर्यंत त्याने तो व्हायरस अनेक लोकांपर्यंत पसरवलेला असतो.

लक्षणे नसलेल्या केसेस शोधण्याचा एकमेव मार्ग म्हणजे लॅब टेस्ट.
पण लक्षणे नसलेल्या लोकांची तपासणी केली जात नाही, कारण त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, ज्यामुळे अनेकांना संसर्ग होतो.

 

ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron Covid Variant)
कोविड-19 चा सुपर-स्प्रेडर व्हेरिएंट, ओमिक्रॉन जगभरातील लोकांना त्रास देत आहे.
पण कोविडच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेत गंभीर लक्षणे दिसत नाहीत. आणि बहुतेक लोक लक्षणे नसलेले आहेत.
यामुळेच हा व्हायरस झपाट्याने पसरत आहे आणि तो टाळणे कठीण आहे, विशेषतः तुम्ही बाहेर असाल तर.

JAMA नेटवर्क ओपनच्या नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, ओमिक्रॉनमध्ये लक्षणे नसलेल्या प्रकरणांमधून अधिक व्हायरसचा प्रसार होत आहे.

 

Web Title :- Coronavirus Omicron Infection | reasons how yo can catch covid 19 virus without meeting an infected person

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Cold Weather | राज्यात पुढील 3-4 दिवस कडाक्याची थंडी

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या भावात वाढ; जाणून घ्या आजचे दर

 

Rajesh Tope | घाबरू नका ! पालकांनी न घाबरता मुलांना शाळेत पाठवावं – आरोग्यमंत्री राजेश टोपे