Coronavirus : लासलगावमध्ये एकाला केले होम ‘क्वारंटाईन’

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी साऊथ आफ्रिके वरून आलेल्या एका संशयिताला क्वारंटाईन केले होते मात्र कामावर जाण्याचा आग्रहधरल्याने लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टरांनी होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देत कामावर गेल्यास पोलिस कारवाईचा सज्जड दम ही भरला तसेच लासलगाव परिसरातील पुणे , मुंबई आणि नाशिक येथून आलेल्यांची तपासणी केली असतात चाळीस जणांना होम क्वारंटाईन करत घरात राहण्याचा लासलगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टरांनी सल्ला दिला मात्र यांच्यात कुठलेही कोरोनासंदर्भात लक्षणे आढळून आलेली नाही काळजी घेण्याच्या उपाय योजनेसाठी निर्णय घेतल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

गेल्या अनेक वर्षां पासून पुणे व मुंबई आणि परदेशात जाण्याकडे लोकांचा कल होता. मात्र,आता करोनामुळे ‘गावाकडे येणाऱ्याचा ओघ वाढला आहे , त्यामुळे आता सर्वजण स्वतःच्या गावाकडे, देशात येण्यासाठी घाई करीत आहे; पण विमानसेवा,रेल्वे आणि बससेवासुद्धा बंद झाली असल्याने करोनाग्रस्त देशात, राज्यात व शहरामध्ये नागरिक अडकून पडले आहेत. मात्र, सध्या मुंबई-पुण्यातून आलेल्यांना करोना झाला असेल, या भीतीने ग्रामस्थ या लोकांशी दोन हात दूर राहिलेले बरे असे म्हणत करोनाला घाबरून विशेष काळजी घेत आहेत.

शहरात सर्व बंद आहेत. ग्रामीण भागातही बंद आहे, त्यामुळे करोना आजाराचा फैलाव होऊ नये यासाठी नागरिकांनी घरा बाहेर पडू नये, अशा सूचना वारंवार प्रशासनामार्फत दिल्या जात आहेत.मात्र, तरीसुद्धा युवक, काही लोक मुद्दाम बाहेर पडत असल्याने पोलिसांच्या वतीने त्यांना दंडुके बसत आहे.