Coronavirus : 11 ते 15 मे च्या दरम्यान शिगेला पोहचेल कोरोनाची दुसरी लाट, देशात होतील 35 लाख अ‍ॅक्टिव्ह केस, IIT शास्त्रज्ञांचा अंदाज

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोनाची दुसरी लाट 11 ते 15 मे च्या दरम्यान शिगेला पोहचलेली असेल. या दरम्यान देशात 33 ते 35 लाख अ‍ॅक्टिव्ह केस असतील. आयआयटी शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या गणितीय मॉडलवर आधारित रिपोर्टनुसार, मे च्या अखेरीस संसर्गाचा वेग कमी होईल. शुक्रवारी देशात 3.32 लाखापेक्षा जास्त नवीन केस समोर आल्या तर संसर्गामुळे 2,263 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 24.28 लाख अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, अ‍ॅक्टिव्ह केसच्या बाबतीत 10 लाख केसची वाढ होऊ शकते. आयआयटी कानपुर आणि हैद्राबादच्या शास्त्रज्ञांनी आपल्या मॉडलसाठी SUTRA (Susceptible, Undetected, Tested (positive), and Removed Approach) फॉर्मूला वापरला आहे.

या राज्यांमध्ये दिसेल प्रकोप
शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, दिल्ली, हरियाणा, राजस्थान आणि तेलंगणात नवी प्रकरणे 25 ते 30 एप्रिलच्या दरम्यान नवी उंची गाठतील. तर महाराष्ट्र आणि छत्तीसगढमध्ये अगोदरच नवी प्रकरणे शिगेला पोहोचली असण्याची शक्यता आहे. आयआयटी कानपुरचे कम्प्युटर सायन्स विभागाचे प्रोफेसर मनिंदर अग्रवाल यांनी सांगितले की, आम्हाला आढळले की, 11 ते 15 मे च्या दरम्यान उपचाराधीन रूग्णांच्या संख्येत वाढ होण्याचे तर्कसंगत कारण आहे आणि ती 33 ते 35 लाख होऊ शकतात. प्रकरणांमध्ये ही वेगाने होणारी वाढ आहे परंतु तेवढ्याच वेगाने नव्या प्रकरणात घट होण्याची शक्यता आहे आणि मे च्या अखेरपर्यंत यामध्ये नाट्यमय प्रकारे घट होईल.

शास्त्रज्ञांनी आतापर्यंत हे संशोधन पत्र प्रकाशित केलेले नाही आणि त्यांचे म्हणणे आहे की, सूत्र मॉडलमध्ये अनेक विशेष बाजू आहेत तर अगोदरच्या अभ्यासात रूग्णांना विना लक्षणे आणि संसर्गात विभाजित केले होते. नव्या मॉडलमध्ये या वस्तूस्थितीची दखल घेतली गेली आहे की, विना लक्षणांच्या रूग्णांच्या एका भागाचा शोध संक्रमितांच्या संपर्कात आलेल्या लोकांची चाचणी किंवा नियमांद्वारे घेतला जाऊ शकतो.