Coronavirus : ‘स्टॅच्यू ऑफ यूनिटी’ ला 30 हजार कोटींना विकण्यासाठी दिली ‘ऑनलाइन’ जाहिरात, FIR दाखल

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : नर्मदा जिल्ह्यातील केवडिया येथे स्थित ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ विक्रीसाठी ऑनलाईन जाहिरात दिल्याबद्दल अज्ञात व्यक्तीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या उद्रेकाला सामोरे जाण्यासाठी वैद्यकीय पायाभूत सुविधा आणि रुग्णालयांवर होणारा सरकारी खर्च भागविण्यासाठी या पुतळ्याची 30,000 कोटी रुपयांमध्ये विक्रीसाठी जाहिरात देण्यात आली.

पीएम मोदी यांच्या हस्ते झाले होते उद्घाटन

हे सरदार पटेल यांचे स्मारक असून हे स्मारक तब्बल 182 मीटर उंच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2018 मध्ये त्याचे उद्घाटन झाले. केवडिया पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने एफआयआरचा हवाला देत सांगितले की शनिवारी अज्ञात व्यक्तीने ओएलएक्सवर एक जाहिरात दिली ज्यामध्ये त्याने रुग्णालय आणि आरोग्य उपकरणे खरेदी करण्यासाठी 30 हजार कोटी रुपयांना ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ विकण्याची गरज दर्शविली.

नंतर वेबसाइटवरून काढली गेली जाहिरात

निरीक्षक पी टी चौधरी म्हणाले की एका वृत्तपत्रात स्मारकाबाबत माहिती आली तेव्हा अधिकाऱ्यांनी पोलिसांशी तातडीने संपर्क साधला. ते म्हणाले की या संदर्भात विविध कायद्यांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर वेबसाइटवरून ही माहिती हटवण्यात आली.