काय सांगता ! होय, ‘कोरोना’नं मृत्यू झाल्याची अफवा अन् अंत्यसंस्काराला फक्त 10 जण

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन – एका ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू हृदयविकाराने झाला. मात्र कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या अफवेने त्यांच्या अंत्यविधीसाठी केवळ दहा-बारा जण उपस्थित राहिले. प्रशासनाने अफवा पसवणाऱ्या विरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

ही घटना लातूर तालुक्यातील रामेश्वर येथील आहे. ५५ वर्षीय व्यक्ती काही वर्षांपासून पुण्याजवळ असणाऱ्या एका शेतात राहत होते. ते अविवाहित असून त्यांच्या पाठीमागे आई, दोन भाऊ, असा परिवार असून ते रामेश्वर येथे राहत होते. संबधीत व्यक्ती मित्राच्या मुलाच्या विवाहास दोन दिवस बाहेर गावी गेले होते. त्यानंतर ते आपल्या घरी आल्यांनतर त्यांना थंडीताप आला. त्यामुळे गावातील डॉक्टरांकडे उपचार घेण्यास सुरवात केली. मात्र सोमवारी त्यांचा मृत्यू झाला. परंतु गावामधील काही अज्ञात व्यक्तींकडून त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचा चुकीचा संदेश गावात फिरवला गेला. या घटनेची माहिती पोलीस व आरोग्य प्रशासनाला मिळताच आरोग्य विभागातील पथकाने त्यांचे पार्थिव लातूरमधील विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्था व सर्वोपचार रुग्णालय येथे शवविच्छेदनसाठी पाठविले. अखेर मंगळवारी सकाळी शवविच्छेदन करून दुपारी त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात आला.

कोरोनाग्रस्त ठरविले

काही दिवसांपूर्वी उस्मानाबाद येथील एक जण पिंपरी चिंचवडला आला होता. मात्र तो नुकताच गावी परतला, दरम्यान कोरोनो भयगंडाने पछाडलेल्या नातेवाईकांनी त्यास बळजबरीने जिल्हा रुग्णालयात पाठविले. पण आरोग्य विभागाच्या वतीने तो व्यक्ती ठणठणीत असल्याचे जाहीर केले.