‘कोरोना’चा वर्ल्ड सिनेमावर मोठा परिणाम, ‘या’ 5 कलाकारांनी रद्द केली ‘शुटींग’ आणि ‘दौरे’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसच्या वाढत्या दहशतीचा परिणाम अनेक क्षेत्रांवर वाढताना दिसत आहे. फिल्म इंडस्ट्रीही याला अपवाद नाही. जगभरातील मल्टीप्लेक्स आणि थिएटर्सच्या कमाईत मोठी घसरण झाली आहे. लोक कोरोनाच्या भीतीनं सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळत आहेत. चीनसहित साउथ कोरिया, इटली, जापान, याठिकाणी खूप नुकसान होताना दिसत आहे. जगभरातील फिल्म इंडस्ट्रीतील स्टार्सनी आपले प्रोजेक्ट रद्द किंवा स्थगित केले आहेत.

1) डॅनियल क्रेग – हॉलिवूड ॲक्टर डॅनियल क्रेगचा नवीन जेम्स बाँड सिनेमा ‘No Time To Die’ सात महिन्यांसाठी पोस्टपॉन करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात सिनेमा रिलीज होणार होता. आता हा सिनेमा नोव्हेंबर 2020 मध्ये रिलीज होणार आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी बुधवारी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे.

2) खालिद – इंटरनॅशनल पॉप सिंगर खालिदनही आपाला आशियाई दौरा रद्द केला आहे. खालिद बुक माय शो आणि एईजी प्रेजेंट्सच्या सहयोगानं भारतात येणार होता. त्याचा 12 एप्रिल 2020 रोजी मुंबईत कार्यक्रम होता. यानंतर दोन दिवसांनी तो बंगळुरूमध्ये एका कार्यक्रमात सादरीकरणर करणार होता. गेल्या वर्षीच खालिदनं याबाबत माहिती दिली होती.

https://www.instagram.com/p/B5SKU0rDrsG/

https://www.instagram.com/p/B3qJ3g2jeLe/

3) दीपिका पादुकोण – अभिनेत्री दीपिका पादुकोणनं कोरोनाच्या भीतीनं पॅरीस फॅशन वीकमध्ये सहभागी होण्याचं शेड्युल रद्द केलं होतं. कोरोना व्हायरसचा वाढता प्रकोप पाहता या इव्हेंटला जाणं दीपिका पादुकोणनं कॅन्सल केलं आहे. लग्जरी फॅशन हाऊस लुई वीतोंनं पॅरीस फॅशन वीकमध्ये सहभागी होण्यासाठी दीपिकाला आमंत्रण दिलं होतं. हा इव्हेंट 3 मार्चपर्यंत चालणार होता. कोरोना व्हायरसची वाढती प्रकरणं पाहता दीपिकानं आपला हा दौरा रद्द केला आहे.

https://www.instagram.com/p/B8d3-KtH22y/

रिपोर्टनुसार, दीपिका पादुकोणच्या टीमकडून सांगण्यात आलं आहे की, पॅरीसमध्ये सुरु असणाऱ्या लई वीतों फॅशन वीक 2020 या शो मध्ये सहभागी होण्यासाठी दीपिका फ्रान्सचा दौरा करणार होती. परंतु कोरोनानं आता फ्रान्समध्ये प्रवेश केला आहे. अशात तिनं आपला दौरा रद्द केला आहे. फ्रान्समधूनही कोरोनाची काही प्रकरणं समोर येताना दिसत आहेत. दोन लोकांचा या व्हायरसमुळं मृत्यू झाल्याचंही समजत आहे.

4) टॉम क्रूज – मिशन इम्पॉसिबल या फेमस फ्रेंचायजीच्या 7 व्या भागात काम करणारा हॉलिवूड ॲक्टर टॉम क्रूज यानंही आपली शुटींग रद्द केली आहे. कोरोनाच्या भीतीनं त्यानं ही खबरदारी घेतली आहे. टॉमनं 9 आठवड्यांसाठी वेनिसची ट्रीप प्लॅन केली होती. परंतु 200 हून अधिक लोक आजारी झाल्यानं टॉमनं शुटींग शेड्युल रद्द केलं आहे.

5) सलमान खान – सलमान खाननंही आपलं शुटींग रद्द केलं आहे. सलमानला राधे या सिनेमाच्या शुटींगला थायलंडला जायचं होतं. परंतु कोरोनाच्या भीतीनं त्यानं मुंबईतच शुटींग सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.

https://www.instagram.com/p/B9Wrhy3HA4F/