Coronavirus : ‘भजन गायक’ अनुप जलोटा ‘आयसोलेशन’मध्ये, ट्विट करत म्हणाले…

पोलीसनामा ऑनलाईन टीम :  प्रसिद्ध भजन गायक आणि बिग बॉस स्पर्धक अनुप जलोटा यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. अनुप जलोटा मंगळवारी सकाळी 4 वाजता लंडनहून भजन शो करून मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर आले होते. यानंतर त्यांना एअरपोर्टजवळ असणाऱ्या मिराज हॉटेलजवळ आणण्यात आलं आणि आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं होतं. खुद्द अनुप जलोटा यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना याबाबत माहिती दिली आहे.

अनुप जलोटा यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिलं की, “बीएमसीकडून 60 वर्षांच्या लोकांना दिली जाणारी वैद्यकीय मदत पाहून मी भारावून गेलो आहे. मी लंडनहून मुंबईला आल्यानंतर मला थेट मिराज हॉटेलमध्ये आणण्यात आलं आणि डॉक्टरांची एक टीम माझ्या चेकअपसाठी पाठवण्यात आली. इथं लँड करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला माझी विनंती आहे की, त्यांनी सहकार्य करावं आणि कोरोनाला थांबवण्यात योगदान द्यावं.”

अनुप जलोटा यांनी केलेलं ट्विट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. अनपु जलोटा यांचे चाहते आणि अनेक नेटकरी त्यांच्या या ट्विटवर कमेंट करत व्यक्त होताना दिसत आहेत. अनेकांनी त्यांना काळजी घेण्याचाही सल्ला दिला आहे.