वटवाघूळाव्दारे आला ‘कोरोना’ व्हायरस, वर्षभरापुर्वी दिला होता ‘अलर्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनमधील वुहान शहरातून पसरलेल्या कोरोनाव्हायरसबद्दल दररोज नवीन बातम्या समोर येत आहेत. या व्हायरसमुळे पसरलेल्या आजाराबाबत आता एक नवीन अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार वटवाघूळ खाल्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होतो. यापूर्वी कोरोना विषाणू सापाच्या माध्यमातून मानवी शरीरात शिरला आणि संसर्गाच्या प्रसारामुळे, त्याने साथीच्या रोगाचे रूप धारण केले, असे म्हटले जात होते. कोराना विषाणूचा संसर्ग एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे वेगाने पसरतो.

मिळालेल्या माहितीनुसार, पर्यावरण आणि आरोग्यावर कार्य करणार्‍या एका स्वयंसेवी संस्थेशी संबंधित डॉक्टरांनी सांगितले की, आपण कोरोना विषाणूच्या अनुवांशिक क्रमांकाकडे बारकाईने पाहिले तर ते वटवाघूळाच्या जवळ दिसत आहे. बुधवारी, चाइनीज सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या अभ्यासानुसार सांगितले गेले की आतापर्यंत मिळालेल्या आकडेवारीनुसार कोरोना विषाणू यापूर्वी वटवाघूळामध्ये दिसला आहे. जो एक प्राण्यांमधून दुसऱ्या प्राण्यांमध्ये आढळतो. त्यानंतर मानवी शरीरात प्रवेश करतो. वटवाघुळांव्दारे पसरलेल्या रोगांबाबत चीनमध्ये सतत संशोधन होत आहे. अगदी चिनी शास्त्रज्ञांनीदेखील एक वर्षापूर्वी असा इशारा दिला होता की चीनमधील वटवाघुळामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होऊ शकतो.

एका वर्षापूर्वी प्रसिद्ध झालेल्या अहवालात वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी म्हटले होते की, वटवाघुळामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्यामुळे चीनमध्ये विनाश होऊ शकतो. शास्त्रज्ञांनी सांगितले की, कोरोना विषाणूचा प्रसार करण्यासाठी चीनचे वातावरण उपयुक्त आहे. हे देखील साथीच्या आजाराचे रूप घेणार आहे. परंतु या विषाणूचा धोका कधी आणि कोठे उद्भवू शकेल हे ते सांगू शकले नाही असेही त्यांनी म्हटले होते. तसेच कोरोना विषाणूशी संबंधित वेगवेगळ्या दाव्यांद्वारे वैज्ञानिकांनी पुष्टी केली की एसएआरएसशी संबंधित 50 प्रकारचे कोरोना विषाणू वटवाघुळामध्ये आढळले. विशेषत: सार्स, कोरोना विषाणू चीनच्या युन्नान प्रांतातील लोकांच्या शरीरात सापडला. तथापि, नमुना घेताना, विषाणूचा संसर्ग झालेल्यांमध्ये श्वसनाचा कोणताही आजार आढळला नाही.

त्याचबरोबर लंडनमधील कोरोना विषाणूवर संशोधन करणारे शास्त्रज्ञ म्हणतात की, सध्या हि सुरुवात आहे. काहीही नेमकं सांगता येत नाही. काही अहवालात असे आढळले आहे की कोरोना विषाणू साप व वटवाघूळ या दोघांमध्ये आढळला. दोघांमध्ये आढळणारे व्हायरस एकसारखेच होते. हाच विषाणू पुन्हा मानवी शरीरात सापडला.