काय सांगता ! होय, ‘कोरोना’मुळं भारतामध्ये ‘कंडोम’च्या विक्रीत प्रचंड वाढला, विक्रेतेही चक्रावले

पोलीसनामा ऑनलाइन – जगभरासह भारतामध्ये दिवसेंदिवस कोरोना व्हायरस वेगाने वाढत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून विविध राज्यात लॉकडाउन करण्यात आले आहे. मात्र मागील काही आठवड्यांपासून कंडोमच्या विक्रीमध्येही झपाट्याने वाढ झाल्याचे मेडीकल दुकानदारांनी सांगितले कंडोमची विक्री 25 ते 50 टक्क्यांनी वाढली आहे. बहुतांश वेळा ग्राहक कमी संख्येने कंडोम खरेदी करतात. मात्र मागील काही आठवड्यांपासून मोठ्या आकाराची पाकीटे खरेदी करणार्‍या ग्राहकांची संख्या वाढल्याचे औषध विक्रेत्यांनी सांगितले आहे. सामान्यपणे लोक तीन कंडोमचे पाकीट घेण्याला प्राधान्य देत होते. मात्र, कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आल्यापासून आठवडाभरापासून अधिक संख्येने कंडोम असणार्‍या मोठ्या पाकीटांची मागणी वाढली आहे.

10 ते 20 कंडोम असणार्‍या पाकिटांचा खप मोठ्या प्रमाणात वाढला आहे, असे दक्षिण मुंबईमधील औषध विक्रेत्याने सांगितले. तर दुसर्‍या एका विक्रेत्याने अशापद्धतीने मागणी वाढणे चमत्कारीक असल्याचे मत व्यक्त केले आहे. सामान्यपणे सणासुदीच्या काळात कंडोमची विक्री वाढल्याचे दिसून येते. खास करुन नवीन वर्षाच्या काळात कंडोमची विक्री वाढते. पण सध्या करोनाच्या भितीमुळे लोक नेहमी लागणार्‍या औषधांबरोबरच कंडोमचीही खरेदी करताना दिसत आहेत. मी माझ्याकडील कंडोमचा साठा 25 टक्क्यांनी वाढवला असल्याचे एका औषध विक्रेत्याने सांगितलं.

दिल्लीमधील एका औषध विक्रेत्याने मागील आठवड्याभरापासून गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीमध्ये वाढ झाल्याचे निरिक्षण नोंदवले आहे. जे लोकं आधी कंडोमचे एक पाकीट न्यायचे ते आता दोन दोन पाकीटे घेऊन जात आहेत. खास करुन मॉल्स बंद झाल्यापासून या गोष्टी मेडिकलमधून खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे. काही दुकानदारांनी तर पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असल्याचेही म्हटले आहे. ऑफिस आणि बाजार बंद असल्यापासून कंडोमच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे.

पूर्वी कंडोम विकत घेताना भारतीयांना लाज वाटायची. मात्र आता लैंगिक शिक्षण आणि माहितीचा प्रसार झाल्यामुळे अनेकांना कंडोमचे महत्व कळले असून आता कंडोम खरेदीकडे तुलनेने सकारात्मक दृष्टीने पाहिले जात आहे. कंडोम खरेदी करणार्‍या महिलांचे प्रमाण वाढल्याचेही अनेक दुकानदार सांगतात. अनेक महिला आता ग्राहक कंडोम खरेदी करतात, असे मुंबईमधील एक औषध विक्रेता सांगतो. एका व्हायरसमुळे कंडोम आणि गर्भनिरोधक गोळ्यांच्या विक्रीमध्ये एवढ्या झपाट्याने वाढ होईल असा मी कधी विचारही केला नव्हता, अशी प्रतिक्रियाही मुंबईमधील एका औषध विक्रेत्याने दिली आहे.