क्वारंटाईनदरम्यान DJ ची डिजिटल डान्स पार्टी ! विल स्मिथ सहित अनेक हॉलिवूड कलाकार सहभागी

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोना व्हायरसची दहशत पाहून सारी दुनिया सध्या भीतीच्या छायेत आहे. अनेकांनी स्वत:ला घरातच कैद केलं आहे. प्रत्येकजण स्वत:ला क्वारंटाईन करत आहे. बाहेरच्या जगापासून प्रत्येकजण स्वत:ला वेगळं ठेवत आहे. काहीजण घरात काही काम करत आहे परंतु काहींना मात्र घरात बोर झालं आहे. असं असलं तरी डीजे डी नाईसनं यावर उपाय शोधून काढला आहे असं दिसतंय.

कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळं सर्व काही बंद आहे. सिनेमाहॉल, नाटक, पार्टी सारं काही. तुम्ही आजवर अनेक पार्ट्या अटेंड केल्या असतील, पाहिल्या असतील. जर तुमचं पार्टी करण्याचं मन करत असेल तर तुम्ही व्हर्च्युअल पार्टीचा आनंद घेऊ शकता. आज काल डीजे डी नाईस ही पार्टी ऑर्गनाईज करताना दिसत आहे.

डीजे नाईस त्यांच्या इंस्टावरून स्पेशल व्हर्च्युअल पार्टीचं आयोजन करत असतो. ही पार्टी काही मिनिटातच ट्रेंड करताना दिसते. नाईसनं या पार्टीला #ClubQuarabtine असं नाव दिलं आहे. काही दिवसांपूर्वी सुरू केलेली ही पार्टी आता प्रेक्षकांमध्ये खूपच फेमस होताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B-AeHDag25Z/?utm_source=ig_embed

मिशेल ओबामा आणि विल स्मिथ सहभागी
डीजे नाईसनं शनिवारी रात्री अशीच पार्टी ऑर्गनाईज केली होती. या पार्टीत अनेकांनी सहभाग नोंदवला. इंस्टावरून ओप्राह विन्फ्रे, विल स्मिथ, मिशेल ओबामा, मिसी एलियट, एवा ड्यवर्ने, केली रोवलँड अशा अनेक मोठ्या लोकांनी आपला सहभाग नोंदवला आणि या व्हर्च्युअल पार्टीचा आनंद घेतला.