Covid-19 in India : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 9102 नवे पॉझिटिव्ह, 3 जूननंतर पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या कमी नव्या बाधितांची नोंद

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसने आतापर्यंत 1 कोटी 6 लाख 76 हजार 838 लोक संक्रमित झाले आहेत. मागील 24 तासात कोरोनाचे 9 हजार 102 नवे रूग्ण सापडले. 3 जूननंतर पहिल्यांदा एका दिवसात इतक्या कमी केस सापडल्या आहेत. या दरम्यान 15 हजार 901 लोक रिकव्हर झाले आणि 117 जणांचा मृत्यू झाला. तर, 16 मे 2020 च्या नंतर पहिल्यांदा 24 तासात इतके कमी मृत्यू झाले आहेत. याचा अर्थ स्पष्ट आहे की, देश आता कोरोनाविद्धची लढाई जिंकत आहे.

कोरोनातून आतापर्यंत 1 कोटी 3 लाख 45 हजार 985 लोक बरे झाले आहेत, तर 1 लाख 53 हजार 587 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1 लाख 77 हजार 266 रूग्ण असे आहेत, ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 20 लाख 23 हजार 809 लोकांचे व्हॅक्सीनेशन करण्यात आले आहे.

दिल्लीत सीरो सर्वेचा रिर्पोट जारी झाला आहे. त्यानुसार, लवकरच दिल्लीत लोकांमध्ये कोरोनाशी लढण्यासाठी हार्ड इम्यूनिटी विकसित होईल. सर्वे रिपोर्टनुसार, दिल्लीत आतापर्यंत 1 कोटीपेक्षा जास्त लोक कोरोना संक्रमित झाले आहेत. म्हणजे या लोकांना उपचारांची सुद्धा आवश्यकता भासली नाही आणि ते बरे झाले.

महाराष्ट्रात सापडले 1842 नवे रूग्ण
महाराष्ट्रात सोमवारी 1842 नवे कोरोना रूग्ण सापडले. 3080 लोक रिकव्हर झाले आणि 30 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 20 लाख 10 हजार 948 लोक संक्रमित झाले आहेत यापैकी 19 लाख 15 हजार 344 लोक बरे झाले आहेत, तर 50 हजार 815 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 43 हजार 561 रूग्ण असे आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहे.

जगभरात कोरोना संक्रमितांची संख्या 10 कोटी
जगभरातील बहुतांश देशात आता संक्रमितांचा आकडा वेगाने वाढत आहे. मागील 24 तासात 4 लाख 55 हजार नवी प्रकरणे नोंदली गेली आहेत. तर, एका दिवसात 9506 लोकांचा मृत्यू झाला आहे. चांगली बाब ही आहे की, 3 लाख 69 हजार लोक बरेसुद्धा झाले आहेत. जगभरात आता एकुण कोरोना संक्रमितांची संख्या 9 कोटी 97 लाख 55 हजार झाली आहे.