Covid Updates : 24 तासात सापडले कोरोनाचे 12584 नवे रूग्ण, 167 मृत्यू, अ‍ॅक्टिव्ह केसमध्ये भारत 13 व्या नंबरवर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या 1 कोटी 4 लाख 79 हजार 179 केस झाल्या आहेत. मागील 24 तासात कोरोनाचे 12 हजार 584 नवे रूग्ण सापडले. हा 16 जूननंतरचा सर्वात कमी आकडा आहे. सोमवारी 18 हजार 385 लोक बरे झाले आणि 167 रूग्णांचा मृत्यू झाला. कोरोनाच्या संसर्गाने आतापर्यंत 1 कोटी 1 लाख 11 हजार 294 रूग्ण बरे झाले आहेत, तर 1 लाख 51 हजार 327 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. एकुण 2 लाख 16 हजार 558 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्रात 3558 नवे रूग्ण
महाराष्ट्रात सोमवारी 3558 लोक संक्रमित आढळले. 2302 लोक बरे झाले आणि 34 जणांचा मृत्यू झाला. येथे आतापर्यंत 19.69 लाख लोक संक्रमित झाले आहेत. यापैकी 18.63 लाख लोक बरे झाले आहेत, तर 50 हजार 61 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 54 हजार 179 जणांवर उपचार सुरू आहे.

कोरोना व्हॅक्सीनची पहिली बॅच रवाना
देशात 16 जानेवारीपासून कोरोना व्हॅक्सीनेशन सुरू होणार आहे. मंगळवारी सकाळी सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडियाच्या पुणे येथील प्रॉडक्शन सेंटरमधून कोविशील्डची पाहिली बॅच कडेकोट बंदोबस्तात डिस्पॅच झाली आहे. केंद्र सरकारने सोमवारी ऑक्सफोर्ड-एस्ट्रेजेनेकाची व्हॅक्सीन कोविशील्डसाठी सीरम इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ला ऑर्डर दिली होती. ही ऑर्डर एक कोटी 10 लाख डोसची आहे. ऑर्डरनुसार, व्हॅक्सीनच्या एका डोसची किंमत 200 रुपये आहे. यावर 10 रुपये जीएसटी लागेल. म्हणजे किंमत 210 रुपये असेल.

केरळात मॉनिटरिंगसाठी गेली केंद्राची टीम
कोरोनाची वाढती प्रकरणे मॉनिटरिंग करण्यासाठी केंद्र सरकारची टीम सोमवारी केरळला पोहचली. टीमच्या तज्ज्ञांनी केरळचे आरोग्य मंत्री केके शैलजा आणि अधिकारी यांच्या सोबत बैठक केली. केंद्र सरकारने संसर्ग रोखण्यासाठी अनेक सूचना राज्य सरकारला केल्या.