Covid-19 in India : देशात 24 तासात सापडले 13823 नवीन रूग्ण, आतापर्यंत 96.64% लोकांनी ‘कोरोना’ला केले पराभूत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसच्या आतापर्यंत 1 कोटी 5 लाख 95 हजार 660 केस झाल्या आहेत. मागील 24 तासात कोरोनाचे 13 हजार 823 नवीन रूग्ण सापडले. या दरम्यान 16 हजार 988 लोक रिकव्हर होऊन घरी परतले आणि 162 लोकांचा मृत्यू झाला. आतापर्यंत या व्हायरसमुळे 1 लाख 52 हजार 718 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. चांगली बाब ही आहे की, कोरोनातून आतापर्यंत 96.64% म्हणजे 1 कोटी 2 लाख 45 हजार 741 लोक बरे सुद्धा झाले आहेत. जगातील टॉप-20 संक्रमित देशांच्या तुलनेत भारतात सर्वात जास्त वेगाने कोरोना रूग्ण बरे होत आहेत. अमेरिकेचा रिकव्हरी रेट 59.08% आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 87.54% लोक बरे झाले आहेत.

देशात 206 दिवसानंतर अ‍ॅक्टिव्ह केसची संख्या 2 लाखांपेक्षा कमी झाली आहे. आता देशात असे रूग्ण 1.86% म्हणजे 1 लाख 97 हजार 201 आहेत. यापूर्वी 26 जूनला सुद्धा एवढीच संख्या होती. यानंतर पासून लागोपाठ यामध्ये वाढ होत होती. 17 सप्टेंबरला ही 10.17 लाखांपर्यंत पोहचली होती. यानंतर यामध्ये घसरण झाली.

लक्षद्वीपमध्ये सापडली कोरोनाची पहिली केस
लक्षद्वीपमध्ये मंगळवारी कोरोनाचे पहिले प्रकरण समारे आले आहे. हेल्थ मिनिस्ट्रीनुसार, संक्रमित व्यक्ती 4 जानेवारीला कोच्चीहून लक्षद्वीपला आला होता. त्याच्या संपर्कात आलेल्या 31 लोकांची ओळख पटली आहे. यापैकी आणखी 13 लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. लक्षद्वीपची लोकसंख्या सुमारे 68,000 आहे. आतापर्यंत हा केंद्र शासित प्रदेश कोरोना महामारीपासून बचावला होता. आता येथे एकुण 14 केस आहेत.

महाराष्ट्रात 1924 नवे रूग्ण
महाराष्ट्रात मंगळवारी 1924 लोक कोरोना संक्रमित आढळले. 3854 लोक रिकव्हर झाले आणि 35 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 19 लाख 92 हजार 683 लोकांना संसर्ग झाला आहे. यामध्ये 18 लाख 90 हजार 323 लोक बरे झाले आहेत, तर 50 हजार 473 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 50 हजार 680 रूग्ण आहेत ज्यांच्यावर उपचार सुरू आहे.