Covid-19 in India : कोरोनाच्या प्रकरणांमध्ये सर्वात मोठी घसरण, 24 तासात सापडले 16375 नवे रूग्ण, 201 मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   देशात कोरोना संक्रमितांच्या आकड्यात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली आहे. मागील 24 तासात कोरोनाचे 16 हजार 375 नवे रूग्ण सापडले आहेत. सोमवारी 29 हजार 91 रूग्ण बरे झाले. 201 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत कोरोनाने 1 कोटी 3 लाख 56 हजार 844 लोक संक्रमित झाले आहेत. यापैकी 99 लाख 75 हजार 958 लोक बरे झाले, तर 1 लाख 49 हजार 850 लोकांनी या महामारीमुळे जीव गमावला आहे. सध्या 2 लाख 31 हजार 36 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत.

आरोग्य मंत्रालयानुसार, देशात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची प्रकरणे वाढून 38 झाली आहेत. सोमवारी 9 लोकांमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट असल्याचे निष्पन्न झाले. मात्र, नव्या स्ट्रेनचे कोणत्या राज्यात किती रूग्ण सापडले, याची माहिती अजून देण्यात आलेली नाही.

अ‍ॅक्टिव्ह केसमध्ये भारत 10व्या स्थानावर

अ‍ॅक्टिव्ह केसमध्ये जगात भारत 10व्या स्थानावर आहे. कोरोना संक्रमितांच्या संख्येनुसार भारत जगात दुसरा सर्वात प्रभावित देश आहे. जगात अमेरिकेनंतर सर्वात जास्त रिकव्हरी भारतात झाली आहे. मृत्यूंच्या बाबतीत अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारताचा नंबर आहे.

महाराष्ट्रात सोमवारी सापडल्या 2765 नव्या केस

महाराष्ट्रात सोमवारी 2765 नव्या केस मिळाल्या. 10 हजार 362 लोक रिकव्हर झाले आणि 29 जणाचा मृत्यू झाला. आतापर्यंत 19 लाख 47 हजार 11 लोकांना संसर्ग झाला आहे. यामधील 18 लाख 47 हजार 361 लोक बरे झाले आहेत, तर 49 हजार 695 रूग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या 48 हजार 801 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.