Coronavirus : 24 तासात सापडले ‘कोरोना’चे 18139 नवीन रूग्ण आणि 234 मृत्यू, ‘या’ 4 राज्यात सर्वात जास्त अ‍ॅक्टिव्ह केस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Coronavirus cases in India Latest News Updates : देशात कोरोना व्हायरसच्या आतापर्यंत 1 कोटी 4 लाख 13 हजार 417 केस झाल्या आहेत. मागील 24 तासात कोरोनाचे 18 हजार 139 नवे रूग्ण सापडले. या दरम्यान 20 हजार 539 लोक बरे होऊन घरी परतले, तर 234 लोकांचा मृत्यू झाला. कोरोनातून आतापर्यंत 1 कोटी 37 हजार 398 रूग्ण बरे झाले आहेत. 1 लाख 50 हजार 570 रूग्णांचा मृत्यू झाला आहे आणि 2 लाख 25 हजार 449 लोकांवर उपचार सुरू आहेत. या दरम्यान, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगढ आणि पश्चिम बंगालला पत्र पाठवले आहे. त्यांनी या राज्यांना आपल्या इथे कोरोना प्रकरणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पावले उचलण्यास सांगितले आहे. या राज्यांमध्ये अलिकडील काही दिवसात नव्या प्रकरणांच्या संख्येत स्थायी घसरण दिसून आलेली नाही.

केरळनंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त अ‍ॅक्टिव्ह केस
देशातील एकुण अ‍ॅक्टिव्ह केसपैकी 59% केस याच राज्यांमध्ये आहेत. यापैकी सर्वात जास्त केरळमध्ये सुमारे 28.61% प्रकरणे आहेत. यानंतर महाराष्ट्रात 22.79%, छत्तीसगढमध्ये 3.99% आणि पश्चिम बंगालमध्ये 3.89% केस आहेत. या राज्यांना सक्त देखरेख ठेवणे आणि प्रकरणांच्या तपासणीसाठी पावले उचलण्याचा सल्ला दिला आहे.

अ‍ॅक्टिव्ह केसमध्ये जगात भारताचे 11वे स्थान
अ‍ॅक्टिव्ह केसमध्ये जगात भारताचे 11वे स्थान आहे. कोरोना संक्रमितांच्या संख्येच्या हिशेबाने भारत जगातील सर्वात प्रभावित देश आहे. जगात अमेरिकेनंतर सर्वात जास्त रिकव्हरी भारतात झाली आहे. मृत्यूच्या प्रकरणांमध्ये अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारताचा नंबर आहे.

महाराष्ट्रात 4,382 नवीन कोरोना रूग्ण
महाराष्ट्रात गुरुवारी 4,382 नवीन कोरोना रूग्ण सापडले. 2570 लोक रिकव्हर झाले आणि 66 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 19 लाख 54 हजार 553 लोकांना संसर्ग झाला आहे. यामध्ये 18 लाख 52 हजार 759 लोक बरे झाले आहेत, तर 49 हजार 825 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 50 हजार 808 रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.