Covid-19 in India : कोरोना संसर्गाच्या पुन्हा सापडल्या 40 हजारपेक्षा जास्त केस, 199 लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरस पसरण्याचा वेग वाढलेलाच आहे. मागील 24 तासात 40 हजार 715 कोरोना संक्रमित आढळले आहेत. काल 29 हजार 785 रूग्ण बरे झाले. सोमवारी 199 लोकांचा मृत्यू झाला. 15 मार्चनंतर कोरोना प्रकरणांमध्ये लागोपाठ वाढ नोंदली जात आहे. मागील 24 तासात अ‍ॅक्टिव्ह केसचा आकडा 10,676 ने वाढला. आता 3 लाख 45 हजार 377 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

आरोग्य मंत्रालयानुसार, देशात आतापर्यंत 1 कोटी 16 लाख 86 हजार 796 लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी 1 कोटी 11 लाख 81 हजार 253 रूग्ण बरे झाले आहेत, तर 1 लाख 60 हजार 166 लोकांनी आपला जीव गमावला आहे. आतापर्यंत 4 कोटी 84 लाख 94 हजार 594 लोकांना व्हॅक्सीनेट करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाचे 24,645 नवे रूग्ण सापडले. 19,463 रूग्ण बरे झाले आणि 58 लोकांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 25.04 लाख लोकांना कोरोना संसर्ग झाला आहे. यापैकी 22.34 लाख रूग्ण बरे झाले, तर 53,457 संक्रमितांनी जीव गमावला आहे. आता 2.15 लाख रूग्णांवर उपचार सुरू आहे.

इतर राज्यांमध्ये मागील 24 तासात सापडलेले कोरोना रूग्ण :
* दिल्ली : 888
* पंजाब : 2,299
* गुजरात : 1,640
* कर्नाटक : 1,445
* तमिळनाडु : 1,385
* केरळ : 1,239

* कालच्या दिवसात एकुण चाचण्या 9 लाख 67 हजार 459
* कोरोनाच्या रूग्णांच्या बाबतीत भारत जगात पुन्हा दुसर्‍या नंबरवर