Covid-19 In India : देशात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 43082 नवे पॉझिटिव्ह, अ‍ॅक्टीव्ह केसमध्ये भारत 7 व्या नंबरवर

नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसच्या संक्रमितांची संख्या 93 लाख 9 हजार 787 झाली आहे. मागील 24 तासात कोरोनाचे 43 हजार 82 नवे रूग्ण सापडले आहेत. यादरम्यान 36 हजार 582 रूग्ण बरे झाले आणि 492 रूग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 35 हजार 715 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत एकुण 87 लाख 18 हजार 517 रूग्ण बरे झाले आहेत. एकुण अ‍ॅक्टिव्ह केसचा आकडा सुद्धा 9 दिवसानंतर वाढून 4 लाख 55 हजार 555 च्या पुढे गेला आहे. देशात कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांच्या दरम्यान चिंतेची बाब ही आहे की, नव्या प्रकरणांच्या तुलनेत बरे होणार्‍या लोकांची संख्या कमी होऊ लागल्याने रिकव्हरी दरात अंशत: घसरण नोंदवली गेली आहे आणि तो 93.61 टक्केवर आला आहे.

भारत जगातील सर्वात संक्रमितांच्या बाबतीत दुसर्‍या नंबरवर आहे. तर सर्वात जास्त मृतांच्या प्रकरणात तिसर्‍या नंबरवर आहे. सोबतच भारत असा सातवा देश आहे जिथे सर्वात जास्त अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. सर्वात जास्त अ‍ॅक्टिव्ह केस अमेरिका, फ्रान्स, इटली, बेल्जियम, ब्राझील आणि रशियामध्ये आहेत.

सतत घटत आहे रिकव्हरी रेट
देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या केस वाढत आहेत आणि याच्या तुलनेत बरे होणार्‍या रूग्णांची संख्या कमी होत आहे. यामुळे अ‍ॅक्टिव्ह केसमध्ये वाढ होत आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, दिल्लीत अ‍ॅक्टिव्ह रूग्ण वाढत आहेत. या राज्यांमध्ये प्रत्येक दिवशी बरे होणार्‍या रूग्णांपेक्षा जास्त नवीन केस येऊ लागल्या आहेत.

महाराष्ट्रात सापडले 6406 नवे रूग्ण
महाराष्ट्रात आतापर्यंतचा एकुण रूग्णांचा आकडा वाढून आता 17 लाख 95 हजार 959 झाला आहे. मागील 24 तासांच्या आत राज्यात 6406 नवीन रूग्ण सापडले तर 4844 लोक बरे झाले आणि 65 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 16 लाख 63 हजार 723 लोक बरे झाले, तर मृतांची एकुण संख्या वाढून 46 हजार 748 झाली आहे.

मागील 24 तासातील आकडेवारी

दिल्ली
नवीन रूग्ण 5246
बरे झाले 5361
मृत्यू 99

गुजरात
नवीन रूग्ण 1540
बरे झाले 1283
मृत्यू 14

उत्तर प्रदेश
नवीन रूग्ण 2,237
अ‍ॅक्टिव्ह रूग्ण 25,422
मृत्यू 10