Coronavirus : भारतात 227 नवीन प्रकरणं, कोरोनाची  एकूण संख्या 1251 वर

पोलीसनामा ऑनलाइन –  कोरोना व्हायरस देशात वेगाने वाढत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार देशात संक्रमित लोकांची संख्या आतापर्यंत 1 हजार 251 वर पोहोचली आहे. त्यापैकी 1 हजार 117 सक्रिय प्रकरणे आहेत, तर 32 लोकांचा कोरोनाने बळी गेला आहे. मात्र, 102 जणांनी या आजारावर मातही केली आहे.महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून सर्वाधिक लोक संक्रमित झाले आहेत.  महाराष्ट्रात 216 लोकांना संसर्ग झाला असून आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 39 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सोमवारी महाराष्ट्रात दोन लोकांचा मृत्यू झाला, त्यापैकी एकाचा मृत्यू पुण्यात आणि दुसरा मृत्यू हा मुंबईत झाला आहे.

भाारतात कोरोनाने अद्याप फार डोके वर काढलेले नाही. तिसर्‍या टप्प्यात पोहोचला नाही. 21 दिवसांचा लॉकडाऊनची मुदत वाढविण्याची तातडीची योजना नाही, असे सोमवारी सरकारने सांगितले आहे. भारतीय सैन्याने पुढील महिन्यात संभाव्य आणीबाणीच्या घोषणेविषयी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेली ’बनावट’ पोस्ट नाकारले आहे. राजस्थान, हरियाणा, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशसह देशाच्या विविध भागांत कोरोना विषाणूची नवीन प्रकरणे समोर आली आहेत. दिल्ली पोलिसांनी आज निजामुद्दीनमधील एका मोठ्या भागाला वेढले आहे, तेथे काही दिवसांपूर्वी एका धार्मिक कार्यक्रमात उपस्थित असलेल्या व्यक्तिला कोरोना झाल्याचं समोर आलं आहे.

दिल्लीत परवानगी न घेता सुमारे 200 जणांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या तेलंगणाच्या सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा परिस्थितीत या कार्यक्रमात येणाऱ्या लोकांची स्वतंत्रपणे चौकशी केली जात आहे. नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम एक पृथक केंद्र बनविण्यात आले आहे, आवश्यकतेनुसार या लोकांना तिथे ठेवले जाणार आहे.

आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव्ह अग्रवाल म्हणाले की, भारतात संक्रमित रूग्णांची संख्या 100 ते 1000 पर्यंत पोहोचण्यासाठी 12 दिवस लागले आहेत. तर या संकटात ग्रस्त विकसित देशांमध्ये या काळात रूग्णांची संख्या 3,500 ते 8,000 इतकी होती. संसर्ग रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या आधारे विकसित देशांपेक्षा भारतात संक्रमणाच्या वाढीची गती कमी आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like