Coronavirus : सलग 8 व्या दिवशी भारतात आढळले अमेरिका-ब्राझिल पेक्षाही जास्त नवे पॉझिटिव्ह, बाधितांचा आकडा 23 लाखाच्या पुढं

नवी दिल्ली : वृत्त संस्था – देशात कोरोना रूग्णांचा आकडा मंगळवारी 23 लाखांच्या पुढे गेला. आतापर्यंत देशात 23 लाख 29 हजार 639 लोक संक्रमित झाले आहेत. 24 तासात 60 हजार 963 नव्या केस आल्या आहेत. एका दिवसात 704 रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे. हा लागोपाठ 8 वा दिवस आहे, जेव्हा अमेरिका आणि ब्राझीलपेक्षा जास्त केस आल्या आहेत. यामध्ये दिलासादायक बाब म्हणजे एका दिवसात 56 हजार 461 लोक बरे सुद्धा झाले आहेत. कोरोनातून रिकव्हर होणार्‍या रूग्णांचा आकडा वाढून आता 16 लाखांपेक्षा जास्त झाला आहे. रिकव्हरी रेट सध्या 70% आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या माहितीनुसार, देशात सध्या 6 लाख 43 हजार 948 अ‍ॅक्टिव्ह केस आहेत. कोरोने आतापर्यंत 46 हजार 91 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 16 लाख 39 हजार 599 लोक रिकव्हर झाले आहेत.

देशातील 7 राज्य अशी आहेत जेथे कोरोनाची प्रकरणे 1 लाखांच्या पुढे गेली आहेत. यामध्ये पहिले नाव महाराष्ट्राचे आहे. येथे लाखांपेक्षा जास्त प्रकरणांची नोंद झाली आहे. यानंतर तमिळनाडु, आंध्र प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालचा सहभाग आहे.

महाराष्ट्रात मंगळवारी 256 रूग्णांचा मृत्यू
महाराष्ट्रात मंगळवारी कोरानाची 11,088 नवी प्रकरणे समोर आली, ज्यामुळे एकुण संक्रमितांची संख्या 5,35,601 झाली आहे. तर संक्रमणामुळे आणखी 256 रूग्णांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये 48 मृत्यू मुंबईत झाले. नव्या प्रकरणांसह राज्यात एकुण संक्रमित रूग्णांची संख्या 5,35,601 झाली आहे. तर कोविड-19 ने मरणार्‍यांची एकुण संख्या 18,306 झाली आहे.

भारत जगातील तिसरा सर्वात प्रभावित देश
कोरोना संक्रमितांच्या बाबतीत अमेरिका आणि ब्राझीलनंतर भारत तिसरा सर्वात प्रभावित देश आहे. देशात कोरोनाची प्रकरणे वाढण्याचा वेग जगात पहिल्या नंबरवर आहे. भारतापेक्षा जास्त प्रकरणे अमेरिका (5,304,394), ब्राझील (3,112,393) मध्ये आहेत.