Coronavirus : ‘कोरोना’चा भारतातील 5 वा बळी, जयपुरमध्ये इटलीच्या महिलेचा मृत्यू

जयपूर : वृत्त संस्था  – देशात कोरोना व्हायरसमुळे पाचवा मृत्यू झाला आहे. जयपूरमध्ये एका महिलेचा शुक्रवारी मृत्यू झाला. ही महिला इटलीची असून ती 69 वर्षांची होती. तिला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्याने तिच्यावर फोर्टीस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. देशात कोरोना व्हायरसचे रूग्ण वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे. याची दखल घेऊन पीएम मोदी यांनी रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन देशातील जनतेला केले आहे.

या महिलेच्या मृत्यूनंतर आता भारतात कोरोना व्हायरसमुळे मरण पावलेल्या रूग्णांचा आकडा वाढला असून तो आता 5 झाला आहे. भारतातही कोरोनाचे रूग्ण सतत वाढत आहेत. देशातील संक्रमित रूग्णांची संख्या 180 झाली आहे. ज्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 लोक बरे झाले आहेत.

या व्हायरसमुळे संपूर्ण जग अलर्ट मोडवर आहे. चीनमधील प्रकोप कमी झाला असला तरी युरोप आता केंद्र बिंदू झाला आहे. तर अमेरिकेत आपत्कालीन स्थिती जाहीर करण्यात आली आहे. कोरोना व्हायरसचा सुरूवातीचा केंद्रबिंदू असलेला चीन पूर्णपणे हवालदिल दिसून आला. परंतु आता स्थिती सुधारत आहे. आता पुढील केंद्र बिंदू युरोप झाला आहे. यूरोपच्या अनेक देशात कोरोनाचा प्रकोप सुरू झाला आहे.

कोरोना व्हायरसमुळे चीननंतर सर्वात जास्त प्रभावित इटली आहे. येथे 31 हजारपेक्षा जास्ते लोकांन संसर्ग झाला आहे. युकेमध्ये 2600पेक्षा जास्त लोकांना याची लागण झाली आहे. तसेच 100 पेक्षा जास्त लोकांना येथे मृत्यू झाला आहे.