Coronavirus : पाकिस्तानी व्यक्तीनं सॅनिटायजर समजून Fire Extinguisher चा केला वापर, Video होतोय ‘व्हायरल’ (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसची चिंता लागली आहे. प्रत्येक देश या उपचारावर औषधे शोधत आहे. सध्या हा रोग वेगाने वाढत आहे. या आजारामुळे पाकिस्तानची देखील सुटका झालेली नाही. पाकिस्तानमध्येही कोरोना व्हायरस संसर्गाची पाच नवीन प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यानंतर कोविड-19 संक्रमित लोकांची संख्या वाढून 33 झाली आहे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या रुग्णालयात संशयित म्हणून काही लोकांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, पाकिस्तानमधूनच सोशल मीडियावर एक विचित्र प्रकारचा व्हिडिओ समोर आला आहे. जो तेजीने व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती दुकानात जाताना दिसत आहे. जो दुकानातील अग्निशामक यंत्रणेकडे जातो. तो त्याला हेण्ड सेनिटायझर समजून ओपन करतो. काही वेळानंतर त्यामधून धूर आल्यानंतर तो तेथून बाजुला सरकतो. ही अग्निशमन यंत्रणा बर्‍याचदा आग विझविण्यासाठी वापरली जाते, परंतु हात स्वच्छ करण्यासाठीही याचा उपयोग होऊ शकतो असे त्याला वाटले.

व्हायरल व्हिडिओ पाकिस्तानमधील गुंजनवालचा असल्याचे सांगितले जात आहेत. या व्यक्तीच्या या कृत्यानंतर लोकांनी सोशल मीडियावरही त्याची खिल्ली उडविली जात आहे. तथापि, हा व्हिडिओ पाहून आपण देखील या व्यक्तीसारखी अशी क्रिया करु नये. अन्यथा तुमचे हात जळू शकतात किंवा तुम्ही जखमी देखील होऊ शकता,अशी विनंती केली जात आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like