Corona Virus : ‘कोरोना’चा हाहाकार ! दर तासाला होतोय 6 जणांचा मृत्यू, आतापर्यंत 1532 जणांचे प्राण गेले

वुहान : वृत्तसंस्था – चीनमध्ये कोरोना व्हायरस मुळे चांगलीच खळबळ माजली आहे . यात चीनमध्ये एका दिवसात १४३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे . या व्हायरसमुळे १ हजार ५२३ वर मृतांचा आकडा पोहचला आहे.

चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने, अशी माहिती दिली कि, देशात व्हायरसच्या संसर्गामुळे 143 लोकांचा मृत्यू आणि 2,641 लोकांना संसर्ग झाल्याचा सांगितलं आहे. चीनमध्ये या संसर्गची संख्या हि वाढत चालली आहे. आता त्याची संख्या ६६ हजार ४९२ झाली आहे. हुबेई प्रांतात शुक्रवारी 143 जणांचा मृत्यू झाला. याव्यतिरिक्त, हेनानमध्ये दोन आणि बीजिंग आणि चोंगकिंग येथे एकाचा मृत्यू झाला. असे आयोगाने म्हटले आहे.

चिनी अध्यक्ष शी. जिनपिंग यांनी या आजारावर उपचार करण्यासाठी आणि बचावासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाऊड संगणकीय अशा डिजिटल तंत्रज्ञानाची मदत करण्याचे आवाहन केले. शुक्रवारी चीन सरकारने हुबेई प्रांत सोडून देशाच्या इतर भागात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या ‘सक्तीने घट’ ची रुपरेषा आखली. वुहानच्या रुग्णालयात साहित्य आणि इतर ऑपरेशन्समध्ये मदत करण्यासाठी रोबोट तैनात केले आहेत.

देशातील विषाणूच्या एकूण पुष्टी झालेल्यांपैकी ही संख्या 3. 8 टक्के आहे. वृत्तसंस्था शिन्हुआने राष्ट्रीय आरोग्य आयोगाच्या हवाल्याने सांगितले की, यापैकी सहा जणांचा विषाणूमुळे मृत्यू झाला आहे, जे देशातील एकूण मृत्यूंपैकी 0. 4 टक्के आहे.

You might also like