बंगाल ‘टायगर’ ! सौरव गांगुलीकडून गरीब-गरजुंसाठी 50 लाखांची मदत

पोलिसनामा ऑनलाईन टीम – भारताचा धडाकेबाज किकेटपटू आणि बंगाल टायगर नावाने परिचित असलेल्या सौरव गांगुलीने गरीब व गरजुसाठी 50 लाखांची मदत जाहीर केली आहे. कोरोना तडाख्यामुळे जगभरात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.. या कसोटीच्या काळात गरीब आणि गरजूंना आर्थिक मदत करण्याचा निर्णय सौरव गांगुलीने घेतला आहे.

कोरोनामुमळे 21 दिवसांच्या लॉकडाऊनने अनेक लोक बाधित आहेत. अशा लोकांच्या समर्थनार्थ गांगुली पुढे आला आहे. त्यामुळेच 50 लाख रुपयांचे तांदूळ दान देण्याचे वचन गांगुलीने दिले आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या निवेदनात जाहीर करण्यात आल्यानुसार सुरक्षेच्या कारणास्तव सरकारी शाळांमध्ये ठेवलेल्या गरजू लोकांना लाल बाबा कंपनीच्या साथीने 50 लाखांच्या तांदळाची मदत गांगुलीकडून करण्यात येणार आहे.

आशा आहे की, गांगुलीच्या पुढाकाराने राज्यातील इतर नागरिकांनाही आपल्या राज्यातील जनतेची सेवा करण्यासाठी अशीच पावले उचलण्याची प्रेरणा मिळेल. दुसरकीडे विनाकारण रस्त्यावर भटकणार्‍यांसाठी सचिनचा खास संदेश दिला आहे. 130 कोटी लोकसंख्या असलेला भारत देश सध्या कोरोना व्हायरसच्या विळख्यात आहे. कोरोनाचा प्रसार कमी करण्याच्या प्रयत्नात 26 मार्चच्या मध्यरात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये गेला आहे. त्यामुळे सौरवकडून हा मदतीचा हात पुढे करण्यात येत आहे. गांगुलीने घेतलेल्या निर्णयाचे कौतुकही करण्यात आले आहे.