Coronavirus : ‘कोरोना’समोर पाकनं गुडघे टेकवले, रूग्णांना दिली ‘या’ पध्दतीची वागणूक, भारतीयांच्या देखील डोळयात पाणी

कराची : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. आशियाई खंडातही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे संक्रमण होताना दिसत आहे. मात्र, या कोरोना विषाणूने पाकिस्तानच्या आरोग्य व्यवस्थेची पोलखोल केली आहे. कोरना विषाणूच्या संसर्गाच्या भीतीने पाकिस्तान-इराण सीमेवर बांधण्यात आलेल्या छावण्यांमध्ये लोकांचे अतिशय वाईट हाल होत आहे.

सीमेवर बाधण्यात आलेल्या छावण्यांमध्ये अस्वच्छ जागा आणि अपुऱ्या सुविधांमुळे तब्बल 6000 हून अधिक लोकांचा जीव धोक्यात आला आहे. पाकने सीमेवर उभारलेल्या छावणीमध्ये दोन आठवडे घालवलेल्या मोहम्मद बाकीर याने छावणीमधील सत्य स्थानिक माध्यमांसमोर मांडले आहे. बाकीरने यावेळी स्वच्छता सुविधा तर दूरच लोकांना स्वच्छ तंबू आणि शौचालय देखील मिळत नसल्याची माहिती त्याने स्थानिक माध्यमांना दिली आहे.

बाकीरने सांगितले की, मी आजपर्यंत एवढी गलिच्छ जागा कधीच पाहिली नाही. छावणीत दोन आठवडे माझ्या आयुष्यातील सर्वात वाईट दिवस होते. इकडे प्राण्यांपेक्षा वाईट वागणूक माणसांना दिली जात आहे. बाकीरच्या या वक्तव्यानंतर पाकची पोलखोल झाली आहे. तर पाकिस्तानमधील डॉक्टरांनी जर एखाद्या व्यक्तीला संसर्ग होण्याची चिन्ह दिसली तर त्यांना वेगळी ठेवण्याची सोय देखील केली नाही.

छावणीमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी ड़ॉक्टर आणि नर्सचीही कमतरता आहे. डॉक्टरांनाच औषधासाठी पैसे द्यावे लागतात. तर नाव न छापण्याच्या अटीवर एकाने डॉक्टरने सांगितले की, पहिल्या वीस दिवसांत बऱ्याच लोकांना कोरनाचा संसर्ग झाला आहे. पण पुढील तीन आठवडे पाककडे कोणतीही चाचणी सुविधा उपलब्ध नव्हती असे त्यांनी सांगितले. पाकमध्ये सध्या 600 हून अधिक कोरोनाचे रुग्ण असून त्यांना योग्य त्या सुविधा पुरवल्या जात नाहीत. पाकीस्तान-इराण ही 600 किमीची सीमा आहे. इराणमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे इराणमध्ये राहणारे लोक पाकमध्ये मायदशी परतत आहेत. त्यामुळे पाकिस्तानमधील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.