Coronavirus : पाकिस्तानमध्ये 300 ‘कोरोना’ग्रस्त रूग्ण तर दोघांचा मृत्यू

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – चीनमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत आहे. मात्र जगातील दुसऱ्या देशांमध्ये त्याची संख्या वाढत आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोनामुळे पाकिस्तानमध्ये ३०० हून अधिक लोकांना त्याची लागण झाली असून, दोघांचा मृत्यू देखील झाल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तानमधील सिंध प्रांतामध्ये सर्वाधिक २०८ रुग्ण आढळले आहे. तसेच पंजाब प्रांतात ३३ आणि बलुचिस्तानमध्ये २३ रुग्ण आढळले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्याकडील गंभीर परिस्थिती पाहता जागतिक बँकेकडे मदत मागितली आहे.

पाकिस्तान समोर कोरोनाला रोखण्याचे मोठे आव्हान आहे. २७० सार्वजनिक रुग्णालये आणि लॅबद्वारे कोरोनाचा संसर्ग रोखणे अशक्य आहे. पाकिस्तान सरकारने दिलेल्या माहितीनुसार मास्क, किट्स व इतर आरोग्य यंत्रणा आणखी मजबूत करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. यासाठी जागतिक बँकेकडून १४ कोटी डॉलर मिळतील अशी अपेक्षा आहे.

दहशदवाद्यांना पाठबळ देण्यासाठी हजारो कोटी उधळणाऱ्या पाकिस्तानची कोरोना संसर्गाने चांगलीच कोंडी केल्याचे दिसत आहे. जगभरातील कोरोनाला रोखण्यासाठी बाजारपेठा, हॉटेल बंद ठेवण्यात येत असताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तसे करू शकत नसल्याचे म्हटले आहे. पाश्चिमात्य देशांसारखे शट डाऊन करण्याची जोखीम आम्ही घेऊ शकत नाही. कारण येथील २५ टक्के लोक दारिद्र्य रेषेखालील आहे. शहरे बंद केली तर या लोकांना कोरोनापासून वाचवू पण ते उपाशी मरतील, अशी भीती इम्रान खान यांनी व्यक्त केली.

पाकिस्तान मध्ये क्रिकेट स्टेडियम, शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी बंद करण्यात आल्या आहे. इतर देशांपेक्षा पाकिस्तानला कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसणार आहे. कारण या देशाच्या सीमा खुल्या आहे. कोणीही आत बाहेर करू शकत. तसेच येथील दवाखान्याची स्थिती चांगली नाही.