भारताच्या मदतीला पाकिस्तानही सरसावले; PM मोदींना पत्र लिहून म्हणाले – ‘आम्ही रूग्णवाहिका पाठवतो’

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने उच्चांक गाठला आहे. गेल्या वर्षीची तुलना करता यंदा ही लाट अधिक चिंताजनक आहे. यामुळे अनेक आरोग्य सुविधेचा तुटवडा निर्माण झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येबरोबर देशात मृत्यूचे प्रमाण देखील अधिक आहे. देशातील अशी अवस्था पाहून पाकिस्तान सुद्धा मदतीसाठी सरसावला आहे. तर पाकिस्तानने भारतासाठी ५० रुग्णवाहिका देण्याचे म्हटले आहे. याबाबत पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र देखील लिहिले असल्याचे समजते.

पंतप्रधान मोदींना पाकिस्तान येथील एधी फाउंडेशनलाचे कार्यकारी व्यवस्थापक, ट्रस्टी असणाऱ्या फैजल एधी यांनी पत्र लिहिले असल्याची माहिती मिळाली आहे. मोदींना लिहिलेले हे पत्र सोशल नेटवर्किंगवर प्रसारित झाले आहे. फैजल एधी, एधी फाऊण्डेशनचा कार्यकारी ट्रस्टी स्वत: माझ्या संस्थेतील एक टीम भारतामध्ये मदतीसाठी पाठवू इच्छितो. आताची परिस्थिती गंभीर आहे, याची आम्हाला जाणीव असल्यानेच आम्ही तुम्हाला पूर्ण सहकार्य करण्यास तयार आहोत, असे या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. या दरम्यान. पाकिस्तानात जवळजवळ एका दशकाहून जास्त काळ वास्तव्य केल्यानंतर २०१५ साली भारतात परतलेली मूकी आणि बहिरी असलेल्या गीताची देखभाल पाकिस्तानमध्ये एधी फाउंडेशनने केली होती. गीता भारतात परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिची भेट घेऊन पाकिस्तानात तिचा सांभाळ करणाऱ्या एधी फाउंडेशनला तब्बल १ कोटी रूपयांची मदत जाहीर केली होती.

काय म्हणाले पाकिस्तान?
तुमच्या नियोजनात आमची अडचण होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. त्यामुळे आमच्याकडून पाठवण्यात येणाऱ्या रुग्णावाहिकांसोबत आम्ही स्वयंसेवकांची टीमही पाठवू. आम्हाला ही योजना राबवताना भारताकडून काहीच नको आहे. आम्ही आमचे इंधन, जेवण आणि इतर गोष्टी टीमसोबत पाठवू, असे देया पात्रात नमूद करण्यात आलं आहे. तसेच, आमच्या टीममध्ये आरोग्य सेवेतील अधिकारी, अन्य अधिकारी, चालक आणि सपोर्टींग स्टाफ असतील. आम्ही भारतातील करोना परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. करोना आणि त्याचा भारतीय नागरिकांवर होणारा परिणाम याकडे आमचे सातत्याने लक्ष आहे. अशा परिस्थितीत शेजारी आणि मित्र म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही आमच्याकडून भारतामध्ये ५० रुग्णावाहिका पाठवू इच्छितो आहे. तसेच रुग्णावाहिकांसह त्याबाबतीतील सेवा आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो आहे. असा पत्रात उल्लेख केला आहे.