Coronavirus : … तर आम्ही मदत करू, ‘कंगाल’ पाकिस्तानच्या PM ची भारताला ‘ऑफर’ !

इस्लामाबाद : वृत्तसंस्था – चीनच्या वुहान शहरांतून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात थैमान घातले आहे. अशात पाकिस्तानसारखा देश आर्थिक डबघाईला आल्याने कर्ज काढून देश चालवण्याची वेळ आली आहे. त्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताला मदत करण्याची ऑफर दिली आहे. इम्रान खान यांनी एका रिपोर्टचा हवाला देत, भारतातील 34 टक्के घर विना मदतीचे 1 आठवडाही जगू शकत नाहीत, असं म्हटलं आहे. पाकिस्तान पंतप्रधान इम्रान खान यांनी या बातमीची लिंक ट्विट करत म्हटल आहे की, या रिपोर्टनुसार भारतात 34 टक्के घरं विना मदतीशिवाय एका आठवड्यापेक्षा जास्त जगू शकत नाहीत.

मी भारताला मदत आणि ट्रान्सफर प्रोग्रामला जनतेपर्यंत पोहचू शकतो, आम्ही कॅश ट्रान्सफर प्रोग्राम जनतेपर्यंत पोहचवला आहे. त्यातील पारदर्शकतेची आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकही झालं आहे.
आमच्या सरकारने अत्यंत पारदर्शक पद्धतीने एक कोटी कुटुंबांना नऊ आठवड्यांत 120 अब्ज रुपये यशस्वीपणे हस्तांतरित केले आहेत. जेणेकरून गरीब कुटुंबांना कोरोना विषाणूच्या काळात जगणं कठीण होणार नाही, असं इमरान खान यांनी म्हटलं आहे. इमरान यांनी एका रिपोर्टचा हवाला दिला आहे ज्यात कोरोना व्हायरस लॉकडाऊनचा भारतात फार गंभीर परिणाम झाला आहे, असं म्हटलं आहे.

भारतीयांच्या खात्यात त्वरित पैसे पाठवण्याची गरज
शिकागो विद्यापीठ आणि मुंबईच्या इन्स्टिट्यूट सेंटर फॉर इंडियन इकॉनॉमीच्या आहवालात हा दावा केला आहे. या आहवालात असे म्हटले आहे की, लॉकडाऊनमुळे सुमारे 84 टक्के कुटुंबाच्या उत्पन्नामध्ये घट झाली आहे. एकूण कुटुंबांपैकी एक तृतीयांश अतिरिक्त मदतीशिवाय आठवड्यापेक्षा जास्त काळ जगू शकत नाही. भारतीयांना त्वरीत पैसे आणि अन्न देण्याची नितांत गरज आहे, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
याच अहवालाची मदत घेऊन पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी भारताचे नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. लॉकडाऊमुळे भारतात अनेक लोक भुकेचे बळी जात आहेत. तस पाकिस्तानात नुकसान झालं नाही. लॉकडाऊनमुळे देशाला 800 कोटीचे नुकसान झाले आहे. पाकिस्तानात कोरोना विषाणूचा कहर माजला असताना इमरान खान भारताला मदत देण्याची भाषा करत आहेत. त्यांचे मंत्री कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. विविध बँकांकडून कर्ज घेऊन पाकिस्तान सध्या आपला देश चालवत आहे.