काय सांगता ! होय, ‘कोरोना’चा सामना करण्यासाठी पाकिस्तानने उघडला ‘खजिना’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने पाकिस्तानला देखील विळखा घातला आहे. परंतु आता या महामारीतून वाचण्यासाठी खजिना खोलला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी मंगळवारी 1.13 ट्रिलियन (1 लाख 13 हजार कोटी रुपये) चा आर्थिक निधी घोषित केला आहे. कोरोना विरुद्ध लढा आणि अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी इमरान खान यांनी या निधीची घोषणा केली.

पाकिस्तानात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढायला लागल्यानंतर विरोधकांनी इमरान खान यांच्यावर हलगर्जीपणाचा आरोप लावला होता. त्यानंतर ही मोठी घोषणा पाक सरकारकडून करण्यात आली. पेट्रोल, डिझेलच्या किंमती देखील 15 रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत. आधीच महागाईने त्रासात असलेल्या पाकचं कोरोना व्हायरसने आता कंबरडं मोडलं आहे. पाकिस्तानमध्ये आतापर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या 990 पोहोचली आहे. तर यात 7 लोकांचा मृत्यू झाला. पाकिस्तानच्या सिंध प्रांताला सर्वात मोठा फटका बसला आहे. येथे कोरोनाग्रस्तांचा आकडा 410 वर पोहोचला. पाकिस्तानच्या पंजाबमध्ये 296 तर बलुचिस्तानमध्ये 110 कोरोनाग्रस्त आढळले आहेत.

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पाकिस्तान सैन्याला देखील पाचारण करण्यात आले आहे. पंतप्रधान इमरान खान यांनी जागतिक बँक आणि इतर देशांकडे कर्जासाठी विनावणी केली होती. त्यानंतर पाकला मिळालेल्या कर्जातून इमरान खान यांनी 1.13 ट्रिलियनचा आर्थिक निधी जाहिर केला आहे. ते म्हणाले की या निधीअंतर्गत मजूरांना 200 अरब डॉलर (4 हजार रुपये), संकटात असलेल्या कुटुंबाला 150 अरब डॉलर (3 हजार) रुपये देणार आहे. तसेच गरीब कुटुंबाला मिळणाऱ्या भत्त्यात देखील 1 हजाराची वाढ करण्यात आली आहे.

पाकिस्तानात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पाकमध्ये आतापर्यंत 7 जणांचा बळी गेला आहे. देशात सर्व प्रवासी वाहन 31 मार्च पर्यंत बंद करण्यात आले आहेत. पाकिस्तानातून कोरोना पॉझिटिव्ह लोकांची माहिती घेतली जात आहे. कोणती व्यक्ती कोरोनाने पॉझिटिव्ह आढळली तर याविषयी त्यांना एसएमएसद्वारे माहिती देण्यात येत आहे. चीन आणि दक्षिण कोरियामध्ये फोन ट्रॅकिंगची पद्धत अवलंबली गेली होती जी यशस्वी ठरली. इस्त्रायल देखील फोनद्वारे कोरोनाग्रस्तद रुग्णांच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहेत.