Coronavirus : पाकिस्तानच्या मंत्र्यानं महिलेला विचारला ‘नकोसा’ प्रश्न, Video झाला व्हायरल (व्हिडीओ)

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था  –   सध्या कोरोनाने संपूर्ण जगात थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर देशांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. या दरम्यान सामान्य जनतेस मदत करण्यासाठी प्रशासकीय कर्मचारी, मंत्री, अत्यावश्यक सेवा कर्मचारी काम करत आहेत. या दरम्यान पाकिस्तानी मंत्र्यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यांना टीकेला सामोरे जावे लागत आहे.

या व्हिडिओत पाकिस्तानी महिला मंत्र्याने एका महिलेला असा काही प्रश्न विचारला ज्यांनंतर यूजर्सने तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं. फिरदौस आशिक आवान असे या महिला मंत्र्यांचं नाव असून त्या इमरान यांच्या मंत्रिमंडळात सहाय्यक म्हणून काम करतात. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिरदौस पाकिस्तानमध्ये दौरे काढून लोकांना मदत करत आहे. मात्र या दरम्यान त्यांना एका सामान्य महिलेला विचारलेल्या प्रश्नावरून ट्रोल व्हावं लागलं आहे. या घटनेचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

या व्हिडीओत, फिरदौस या एका महिलेला विचारणा करत आहेत कि औषध कधी मिळालं. त्यानंतर त्या महिलेला मिळालेल्या पैशांचं काय करणार असा प्रश्न विचारतात. ज्यावर ती महिला म्हणते की, माझी आठ मुलं आहेत, त्यांच्यासाठी मी हे पैसे घेऊन जात आहे. महिलेच्या या उत्तरावर फिरदौस यांनी जे बोलले त्यामुळे त्यांना टीकेचा सामना करावा लागला. फिरदौस त्या महिलेला विचारतात की, 8 मुलं? या कामाव्यतिरिक्त तुमचे यजमान काही काम करतात का?. फिरदौस यांच्या या प्रश्नानंतर तेथील उपस्थित लोकांमध्ये एकच हशा पिकला. ती महिलादेखील त्या प्रश्नावर हसून उत्तर टाळते. दरम्यान, या प्रसंगावेळी तिथे काही पुरुष कर्मचारी देखील होते. त्यामुळे एका महिलेने दुसऱ्या महिलेला असा खासगी प्रश्न सार्वजनिक ठिकाणी मोठ्याने विचारणं हे चूक असल्याचं म्हंटल जात आहे. अनेकांनी यावर टिपण्णी केली आहे.