Coronavirus : ‘प्लाझ्मा’ थेरपीच्या क्लिनिकल ट्रायलसाठी मुंबई,पुणे,कोल्हापूरातील सेंटरसह देशातील ‘या’ 21 संस्थांना मिळाली मंजूरी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था: देशात कोरोना संक्रमितांची प्रकरणे झपाट्याने वाढत असून बाधितांची संख्या वाढून 59662 झाली आहे. यापैकी 38834 सक्रिय प्रकरणे आहेत. यादरम्यान कोविड -19 रूग्णांचा प्लाझ्मा थेरपीने उपचारांबद्दल आत्मविश्वास वाढवत आहेत. अशा परिस्थितीत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) 21 संस्थांना प्लाझ्मा थेरपीच्या क्लिनिकल चाचण्यांना मान्यता दिली आहे.

या अंतर्गत 452 नमुने समाविष्ट करण्यात येणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. यात 400 नमुने नोंदविल्यानंतर कोणतीही नवीन संस्था जोडली जाणार नाही. आयसीएमआरने सांगितले की, त्याने अनेक केंद्रांवर क्लिनिकल चाचण्या सुरू केल्या आहेत, ज्याला प्लासिड ट्रायल्स म्हणतात. अधिकारी म्हणाले, “आम्हाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. 111 संस्थांकडून पत्र प्राप्त झाले आहे. 4 मे पर्यंत, आयसीएमआरने या प्लासिड चाचणीसाठी 21 संस्थांना मान्यता दिली आहे.

या थेरपीमध्ये, कोविड -19 मधून बरे झालेल्या एखाद्या व्यक्तीच्या रक्ताच्या प्लाझ्मामधील अँटीबॉडी घेऊन त्यांना कोरोना रूग्णाच्या शरीरात टाकले जाईल, ज्यामुळे संक्रमणास विरोध करण्यासाठी प्रतिरोधक कृती करण्यास सुरवात होते.

या संस्थांना मिळाली मान्यता: –

1.एनएचएल म्युनिसिपल मेडिकल कॉलेज, अहमदाबाद (गुजरात)
2. बीजे मेडिकल अँड सिव्हिल हॉस्पिटल, अहमदाबाद (गुजरात)
3. गुजरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, भावनगर
4. गुजरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सूरत
5. सवाई मानसिंग मेडिकल कॉलेज जयपूर (राजस्थान)
6 . महात्मा गांधी मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, जयपूर (राजस्थान)
7. सदगुरू प्रताप सिंह हॉस्पिटल, लुधियाना (पंजाब)
8. बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पुणे (महाराष्ट्र)
9. सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबई (महाराष्ट्र)
10. राजश्री छत्रपती साहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर हॉस्पिटल, कोल्हापूर (महाराष्ट्र)
11.पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर (महाराष्ट्र)
12. महाराष्ट्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर
13. मदुरै मेडिकल कॉलेज, मदुरै (तामिळनाडू)
14. मद्रास मेडिकल कॉलेज, चेन्नई (तामिळनाडू)
15. मध्य प्रदेश गांधी मेडिकल कॉलेज, भोपाळ
16. मध्य प्रदेश महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल कॉलेज, इंदोर
17. उत्तर प्रदेश शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्था, नोएडा
18. उत्तर प्रदेश संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, लखनऊ
19.कर्नाटक वैद्यकीय विज्ञान संस्था, हुबळी (कर्नाटक)
20. तेलंगणा गांधी मेडिकल कॉलेज (तेलंगणा)
21. चंडीगड पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च